‘कृषी उत्पादन’ निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर !

 

‘कृषी उत्पादन'(Agricultural production) निर्यातीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर . कृषिमंत्री दादाजी भिसे(Agriculture Minister Dadaji Bhise) म्हणाले कि ‘ भाजी व फुलोत्पादन निर्यातीत आपले राज्य प्रथम क्रमांकावर आहे त्याचा मला अभिमान आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी बांधव हे अन्नदाता आहे, कर्नाटकमध्ये ज्याप्रमाणे ई-पीक पाहणी अँप द्वारे केली जाते आपल्या राज्यात हि ई – पीक पाहणी कार्यरत आहे नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल असेही ते म्हणाले.

कर्नाटक राज्याचे कृषिमंत्री(Agriculture Minister of the State of Karnataka) व राज्याचे कृषिमंत्री दादाजी भिसे यांची भेट –
सह्याद्री अतिथीगृहात कर्नाटकचे कृषिमंत्री बी.सी पाटील यांच्या समवेत शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादाजी भिसे यांची भेट घेतली. भेटी द्वारे अनेक शेतीविषयक योजनेबाबत चर्चा करण्यात आली. जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढवता येईल व देण्यात येणाऱ्या सवलती तसेच उत्पादकांना थेट रित्या बाजारात उपलब्ध करून देण्याविषयी महत्वपूर्ण चर्चा करण्यात अली.

शेतकरी आत्महत्या(Farmer suicide) होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना(Permanent measures) शासन स्तरावर करत आहोत, कोरोनाच्या महामारी काळात आपले शेतकरी बांधव शेतात राबत होते, त्यांच्या कष्टामुळे आपल्याला अन्न उपलब्ध होत होते, अश्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या वचनाप्रमाणे महात्मा जोतिबा फुले पीक कर्जमाफी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी प्रोत्सहन म्हणून निधी ५०,०००/- शासन अदा करणार आहे.

महत्वाच्या बातम्या –