शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा कृतज्ञता सोहळा हा कौतुकास्पद – बाळासाहेब पाटील

सातारा – वाई शहराच्या विकासामध्ये विद्यमान, माजी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष, नगरसेवक-माजी नगरसेवक, यांनी महत्वाची भूमिका बजावली असून, त्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा   वाई नगरपरिषदेने आयोजित केला आहे. ही कोतुकास्पद  बाब आहे.त्याचा आदर्श जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांनी घ्यावा असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी केले.

वाई नगरपरिषदेच्या 165 व्या वर्धापन दिन व विद्यमान, माजी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,नगरसेवक यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री श्री .पाटील बोलत होते. या प्रसंगी आ. मकरंद पाटील, मराठी विश्व कोशचे अध्यक्ष   प्रा.श्री.म. दिक्षीत, वाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी किरणकुमार मोरे,

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री.  बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) म्हणाले, वाई शहराला ऐतिहसिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. वाई नगरपरिषदेला 165 वर्ष पूर्ण झाली आहे. हा मोठा कालावधी असून वाई नगरपरिषदेच्या इमारत जागेसाठी 54 लाख रुपये खर्च करुन जागा घेण्यात आली. आज शहराच्या मध्यभागी नगरपरिषदेची भव्य इमारत उभी आहे. नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी आपण जनतेचे सेवक आहोत या भावनेने प्रभागात काम करावे. भविष्यात वाई शहराची वाढ होणार आहे. त्यानुसार दळणवळणाची सुविधा वाढविल्या पाहिजेत. वाई म्हटलं तर कृष्णा नदी सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते . वाई शहराचे सांडपाणी पूर्ण नदीपात्रात येत असल्याने प्रदुषण वाढत आहे. तरी शहराचा सांडपाणी व्यवस्थापन करावे आणि वाई शहराच्या स्वच्छतेत भर घालावी.

यावेळी आ. मकरंद पाटील म्हणाले, कृतज्ञता सोहळ्यात 108 लोकांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कारमुर्तींचा वाईच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. वाई शहरातील  ब्रिटीश कालीन पूल नुकताच पाडण्यात आला. नवीन पुलासाठी शासनाने 15 कोटींची तरतूद केली असून सर्वांना अभिमान वाटेल असा पूल उभा केला जाईल. कृष्णा नदी प्रदुषणासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. नगरपरिषदेने नव्याने बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचा जागेचा प्रश्न मार्गी लावला तर नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –