Share

आरोग्यासाठी उपयुक्त पेय, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…..

Published On: 

🕒 1 min read

सगळ्यात नैसर्गिक पेय म्हणजे “पाणी”. विविध प्रकारचे फळांचे, भाज्यांचे रस म्हणजे शरीरासाठी उत्तम, कारण त्यामध्ये विविध पौष्टिक गुणधर्म आढळून येतात. आज आपण काही आरोग्यासाठी उपयुक्त अशा पेयासंबंधी माहिती करून घेऊ.

मीठ पाणी
मीठ-पाण्यामुळे तोंडातील लाळनिर्मिती करणार्‍या ग्रंथी अधिक कार्यरत होतात. त्यामुळे पोटातील पाचक एन्झाईम्स जे नैसर्गिक मीठ, हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड आणि प्रथिने पचवण्याचे काम करतात. त्यांना पचवण्यास लाळेची मदत होते. त्याशिवाय पोटातील यकृत, आतडे यांच्यामध्ये अन्न पचनास आवश्यक एन्झाईम्स निर्माण होतात. मीठ-पाण्यात अनेक खनिजे असतातच पण हे मीठ पाणी नैसर्गिक जीवाणूविरोधी घटक म्हणून काम करते.

लिंबू पाणी
कुठलीही कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा लिंबू पाणी पिणे केव्हाही उत्तम. लिंबू पाण्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. लिंबू हा पोटॅशिअम आणि कॅल्शिअमचा स्रोत आहे, ज्यामुळे स्नायू आणि हाडांना मजबुती मिळते. लिंबूतून शरीराला अँटि इन्फ्लेमेटरी घटक मिळतात.

नारळ पाणी
बारा महिने मिळणारे, सर्वात सहज उपलब्ध असलेले नैसर्गिक पेय म्हणजे “नारळ पाणी” होय. सकाळी नारळपाणी पिण्यामुळे आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत असते. नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आढळून येतात, त्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जेची पातळी वाढण्यास मदत होते आणि आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. नारळ पाणी हे आरोग्यासाठी चांगला आणि पौष्टिक असा स्रोत आहे. नारळ पाणी पिण्यामुळे आपली त्वचाही टवटवीत राहण्यास मदत होते.

आवळ्याचा रस
आवळ्यांमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आपले शरीर नैसर्गिकपणे डिटॉक्स म्हणजेच शरीरातील नको असलेल्या पदार्थाचा निचरा होण्यास मदत होते. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

कोरफडीचा रस
सकाळी जर आपण कोरफडीचा रस सेवन केला तर आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. कोरफडीच्या गरामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहते. कोरफडीमध्ये असलेल्या अँटी इन्फ्लमेटरी तत्वामुळे शरीरातील वेदना, ताण आणि थकवा दूर होण्यास मदत होते. म्हणून योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत कोरफडीचा रस जरूर सेवन करावा.

भाज्यांचा रस
आपल्याकडे विविध हंगामाप्रमाणे अनेक भाज्या मिळतात, ज्यामध्ये नैसर्गिकरित्या प्रथिन, जीवनसत्व, खनिजे आढळून येतात. जी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत. म्हणूनच भाज्यांच्या रसांचे सेवन करणे, हा निरोगी आरोग्यासाठी उत्कृष्ट असा पर्याय आहे. ह्यामध्ये विशेषकरून हिरव्या पालेभाज्यांचा आवर्जून समावेश करावा. उदा. पालक, पुदिना इत्यादी. हिरव्या भाज्यांचा रस नियमितपणे पिण्यामुळे आपल्याला थकवा जाणवत नाही आणि शरीराला आवश्यक असलेले पौष्टिक घटक त्यातून मिळतात.

काकडी रस
यात जवळपास 96% पाणी आणी फायबर्स असतात. काकडीला इलेक्ट्रोलाइट‌स पॉवरहाउस देखील म्हणतात. हे शरीरातील हानिकारक रसायन आणि एसिडयुक्त पदार्थांना बाहेर काढून पचनक्रियेला सुरळीत करण्यात मदत करते.

कोथिंबीर रस
कोथिंबीर शरीर स्वच्छ करणाऱ्या एंझाइम्सला वाढवते, ज्यामुळे विषारी पदार्थ बाहेर निघतात. यात अँटिसेप्टिक आणि अँटी फंगल गुणांचे प्रमाण जास्त आहे. याचा रस दररोज प्यायल्यास वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.

दालचिनी पेय
दालचिनीमध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट‌स आणि हळदीमध्ये असणारे कुरक्युमिन शरीराला डिटॉक्स करण्याशिवाय वजन कमी करण्यासही मदत करते. एक ग्लास पाण्यात दालचिनीचा तुकडा टाका. यात हळद मिसळा. काही वेळ उकळा, नंतर गाळून घ्या आणी कोमट झाल्यावर प्या.

जिऱ्याचे पेय
जिऱ्याचा पाण्यानेही शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते, तसेच शरीररतील पाण्याची पातळी नियंत्रित राहते. नियमितपणे जिऱ्याचे पाणी पिण्याने झोप चांगली लागते.

कोमट पाणी
कोमट पाणी हे शरीरासाठी केव्हाही उत्तमच. कोमट पाणी सकाळी नियमितपणे पिण्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते तसेच पचनक्रियापण सुरळीत होण्यास मदत होते.

अशा ह्या विविध बहुगुणी पेयांचा समावेश आपल्या रोजच्या आहारात जरूर करावा आणि एक निरोगी आयुष्य जगावे.

महत्वाच्या बातम्या –  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या