Winter Health Care | हिवाळ्यामध्ये का करावे अंड्याचे सेवन?, जाणून घ्या

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) आला की वाढत्या थंडीमध्ये आपल्या सवयी बदलायला लागतात. बदलत्या हवामानासोबत अनेकांच्या खाण्यापिण्याचे सवय देखील बदलायला लागतात. कारण या ऋतूमध्ये शरीराला निरोगी (Healthy) आणि उबदार ठेवण्यासाठी अनेकजण आपल्या आहारात बदल करतात. विशेषता हिवाळ्यामध्ये लोक अंडी (Egg) खाण्यावर जास्त भर देतात. कारण अंडी आपल्या आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर मानले जातात. अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात फॅट उपलब्ध असते जे आपल्या शरीरातील पेशींच्या वाढीस मदत करते. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये नियमित अंड्याचे सेवन केल्याने आपण मोसमी आजारांपासून देखील दूर राहू शकतो. कारण अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक उपलब्ध असतात. अंड्याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही निरोगी आणि सुदृढ राहू शकतात, कारण त्यामध्ये पुढील घटक असतात.

प्रोटीन

अंड्याचे सेवन करून तुम्ही शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन देऊ शकतात. कारण मध्यम आकाराच्या अंड्यामध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रोटीन उपलब्ध असते. शरीरात अँटीबॉडी बनवण्यासाठी प्रोटीनचा उपयोग केला जातो. अँटीबॉडीज शरीराचे बाहेरून होणाऱ्या संक्रमणापासून संरक्षण करते.

फॅट

निरोगी आरोग्यासाठी शरीरामध्ये पोषक फॅट असणे खूप महत्त्वाचे आहे. अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक फॅट आढळून येते. शरीराला मुबलक प्रमाणात पोषक फॅट मिळाल्यास तुम्ही निरोगी राहू शकतात. त्याचबरोबर तुमच्या शरीरातील अवयव ही मजबूत राहू शकतात.

व्हीटामिन डी

व्हीटामिन डी सूर्याची किरणे शोषून घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर हे जीवनसत्व शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत बनवण्यास मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात नियमित अंड्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला मुबलक प्रमाणात व्हीटामिन डी मिळू शकते. व्हीटामिन डी तुमचे मोसमी आजारांपासून देखील रक्षण करते.

जिंक

हिवाळा आपल्या सोबत सर्दी-खोकल्याचा त्रास घेऊन येतो. त्यामुळे तुम्ही हा आजार टाळण्यासाठी देखील अंड्याचे सेवन करू शकतात. कारण अंड्यामध्ये जिंक आढळते. जिंक तुमच्या शरीराला सर्दी आणि खोकल्यापासून वाचवण्यास मदत करू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या