Share

चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या कशा घालवाल? माहित करून घ्या फक्त एका क्लिकवर…

Published On: 

🕒 1 min read

प्रत्येकाला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी तरुण-तरुणींबरोबरच सर्वजण वेगवेगळे सौंदर्य प्रसाधने वापरतात. बऱ्याचदा चांगल्या दर्जाची उत्पादने वापरुनही चेहऱ्याचे सौंदर्य टिकत नाही. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे होय. जसे वय वाढते तसे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिक स्पष्ट होत जातात. ही अवस्था जरी कुणाला आवडत नसेल तरी प्रत्येकालाच याचा सामना करावा लागतो. मात्र योग्य वेळी काही उपाययोजना केली तर या समस्येपासून काही प्रमाणात समाधान मिळू शकते.

  • अर्धा चमचा दुधावरची साय घेऊन त्यात १०-१२ थेंब लिंबाचा रस टाका. हे मिश्रण चांगल एकत्र करून घ्या व रोज रात्री झोपतांना चेहऱ्यावर लेप करा. लेप थोडा सुकल्यावर हलक्या हाताने ५-७ मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. चेहऱ्यावर लेप करण्यापुर्वी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा.
  • कोरफडीमुळे चेहऱ्यावरील मॉईश्चर वाढते, चेहरा साफ बनतो. तसेच चेहरा स्मूथ होऊन त्वचा लवचिक बनते.
  • चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी किंवा लवकर सुरकुत्या पडू नये यासाठी चेहऱ्याचा नियमित मसाज करणे खूप फायद्याचे ठरते. अनेकांना प्रश्न पडेल की मसाज कसला करावा. सुरकुत्या कमी करण्यासाठी तेलाचा मसाज खूप उपयोगी आहे. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेनुसार वेगवेगळे तेल वापरू शकता.
  • पिकलेली केळी व पिकलेली पपई एकत्र करून मिश्रण तयार करा. यामध्ये थोडं मध टाका. एकत्र करून चेहऱ्यावर लेप करावा. लेप थोडा सुकल्यावर हलक्या हाताने ५-७ मिनिटं चेहऱ्यावर मसाज करा. मसाज झाल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवा व कॉटनच्या नॅपकिनने चेहरा स्वच्छ पुसावा. हा लेप आठवड्यातुन ३ वेळा करावा.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या