जायफळ खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

जायफळमध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात. आकारानं लहान असून सुद्धा ज्या बियांमधून जायफळ काढलं जातं त्या बिया आणि ते झाड सुद्धा खूप औषधीयुक्त असतं. आपल्या शरीरात अँटीऑक्सिडंटचं काम जायफळ करतं. जायफळ अँटी इंफ्लेमेटरी आणि अँटी बॅक्टेरिअल गुणांनीही परिपूर्ण असतं. म्हणूनच डाएटमध्ये थोड्या-थोड्या प्रमाणात जायफळचा वापर केला तर अनेक आजारांपासून आपला बचाव करता येतो. चला तर जाणून घेऊ फायदे….

  • कोमट दुधात एक चिमुटभर जायफळाची पावडर घालावी आणि झोपण्यापूर्वी हे दूध प्यावे ते निद्रानाशावर उपयुक्त ठरते.
  • जायफळ नैराश्य आणि चिंता दूर करते.
  • जायफळ हा मसाल्याचा पदार्थ असूनही त्यात जंतुरोधक आणि वेदनाशामक असे गुण आहेत. त्वचेवरील सुरकुत्या, डाग, मुरुमे यासारख्या समस्यांतून सुटका मिळू शकते. त्यामुळे त्वचा स्वच्छ होण्यास मदत मिळते.
  • मायरिस्टिरिन नावाचा घटक जायफळात असतो जो मेंदूची क्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरतो . त्याप्रमाणे जायफळ मेंदूला उत्तेजित करून बौद्धिक थकवा कमी करतो शिवाय स्मरणशक्ती वाढवतो.
  • जायफळ पाचनक्रिया चांगली करतं. दररोज जेवल्यानंतर जायफळ तुकड्याच्या रूपात किंवा पावडर करून त्याचा वापर करावा. पोटाच्या समस्या दुरुस्त करण्यासाठी पाचन क्षमता वाढविण्याचं काम जायफळ करतं.
  • जायफळामध्ये तोंडाची दुर्गंधी दूर करण्याचेही गुण असतात. अनेक वेळा गळ्याजवळ व्हायरस किंवा बॅक्टेरिया चिटकून राहतात आणि त्यामुळे तोंडाला दुर्गंध येतो. जायफळचा वापर पेस्ट सारखा केल्यास तोंडाचा हा दुर्गंध निघून जातो. तसंच इंफेक्शनपासूनही आपला बचाव होतो.

महत्वाच्या बातम्या –