Share

शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना; कडबा कुट्टी यंत्रावर आता मिळणार ५० टक्के अनुदान! ‘असा’ घ्या लाभ

Published On: 

शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना; कडबा कुट्टी यंत्रावर आता मिळणार ५० टक्के अनुदान! ‘असा’ घ्या लाभ

बुलडाणा – दूध उत्पादन वाढविण्याच्या अमुषंगाने चाऱ्याचा योग्य वापर व्हावा. तसेच चारा वाया जावू नये, यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जिल्ह्यात महादूध प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजना राबवली आहे.

मक्याचे कणीस खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे

यामध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबा कुट्टी यंत्राचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा पशुपालकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत डीबीटीनुसार लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी स्वत: नामांकित कंपनीकडून कडबा कुट्टी यंत्र खरेदी करावे. त्याचे जीएसटीचे देयक, फोटो, पशुसंवर्धन अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करावे. यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ५० टक्के अनुदानाची रक्कम जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयामार्फत जमा करण्यात येणार आहे.

आज ‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाला सुरुवात

यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांचा प्रस्ताव पंचायात समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्याकडे सादर करावा. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

ऊस शेतकर्‍यांच्या ऊस लागवडीच्या रंगाचा भंग

भेंडी खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्या

Join WhatsApp

Join Now
शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना; कडबा कुट्टी यंत्रावर आता मिळणार ५० टक्के अनुदान! ‘असा’ घ्या लाभ

🕘 संबंधित बातम्या