राज्यात गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांनी केली कोरोनावर मात

कोरोना

मुंबई – महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्राला काहीसा आशेचा किरण दिसलेला आहे. आज मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्यात आज तब्बल ८२ हजार २६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात दिवसभरात ५३ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याबरोबरच गेल्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनामुळे ८६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ५० लाख ५३ हजार ३३६ वर पोहोचली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचाही सर्वाधिक फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. मात्र आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या ५३ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही ५० लाख ५३ हजार ३३६ एवढी झाली आहे. तर सकारात्मक बाब म्हणजे आज राज्यात ८२ हजार २६६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ८६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ७५ हजार २७७ एवढी झाली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण ४३ लाख ४७ हजार ५९२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यस्थितीत राज्यामध्ये कोरोनाचे ६ लाख २८ हजार २१३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईमध्येही कोरोनाच्या रुग्णसंख्येल लक्षणीय घट झाली असून, मुंबईत आज कोरोनाच्या २ हजार ६७८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर ३ हजार ६०८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात मुंबईमध्ये कोरोनामुळे ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये सध्या कोरोनाचे ४८ हजार ४८४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात अजूनही दैनंदिन पातळीवर ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे परिस्थिती हवीतशी नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे राज्यात लागू असलेल्या निर्बंधांच्या कालावधीत आणखी काही दिवस वाढ करावी लागू शकते, असं विधान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –