‘या’ जिल्ह्यामध्ये ढोबळी मिरची ३७५० ते ५६२५ रुपये क्विंटल

नाशिक – कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.३१ ऑगस्ट) ढोबळी मिरचीची आवक ९६ क्विंटल झाली असून  तिला ३७५० ते ५६२५ रूपये क्विंटल दर मिळाला आहे. सर्वसाधारण दर ५००० रूपये राहिले. आवक साधारण आल्याने दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या देण्यात आली.

वांग्यांची आवक १५८ क्विंटल झाली आहे. त्यास प्रति क्विंटल ३५०० ते ५५०० असा दर मिळाला आहे. त्यास सरासरी दर ४५०० राहिला आहे. फ्लॉवरची आवक ३२५ क्विंटल झाली आहे. त्यास प्रतिक्विंटल ७१५ ते १९६४ दर मिळाला आहे. त्यास सरासरी दर १५७१ राहिला आहे. कोबीची आवक ७३२ क्विंटल झाली आहे. तिला ५०० ते १०८३ असा दर मिळाला आहे. सर्वसाधारण दर ८३४ राहिले.

चिंच खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

भोपळ्याची आवक ५२५ क्विंटल झाले आहे. त्यास १००० ते ३५०० असा दर मिळाला आहे. सर्वसाधारण दर २६६६ राहिला आहे. कारल्याची आवक १२० क्विंटल झाली आहे. त्यास २५०० ते ३९५८ असा दर मिळाला आहे. सर्वसाधारण दर ३७५० राहिला आहे. दोडक्याची आवक ३६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४१६६ ते ८३३३ दर मिळाला. सर्वसाधारण दर ६६६६ रुपये राहिला. आवक घटल्याने दरांत तेजी आहे. गिलक्याची आवक २४ क्विंटल झाली. त्यास ४१६६ ते ५८३३ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७५० राहिला. भेंडीची आवक ३० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ३३३३ दर मिळाला. सर्वसाधारण दर २९१६ राहिला.

ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना आता मिळणार कर्ज

हिरवी मिरचीची आवक ५३५ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १७५० ते ३७५० दर मिळाला आहे. सर्वसाधारण दर २५०० राहिला आहे. काकडीची आवक ५४२ क्विंटल झाली आहे. तिला १५०० ते ३२५० असा दर मिळाला आहे. सर्वसाधारण दर २५०० राहिला आहे. कांद्याची आवक ६७६५ क्विंटल झाली. त्यास ५०० ते १५७५ असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर १४०० राहिला. बटाट्याची आवक १०५१ क्विंटल झाली. त्यास २००० ते २८५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २३५० राहिला. लसणाची आवक ३७ क्विंटल झाली. त्यास ५६०० ते ११६०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ९००० राहिला.

महत्वाच्या बातम्या –

पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती

बळीराजा हतबल; राज्यातील शेतकऱ्यांवर नव्या व्हायरसचं संकट