कापूस व सोयाबीनसाठी १२ नोव्हेंबरपासून आंदोलन पेटणार; रविकांत तुपकर यांचा इशारा

बुलडाणा : सोयाबीनला ८ हजार तर कापसाला १२ हजार रुपये भाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवार, ३१ ऑक्टोबर रोजी एल्गार मोर्चा काढण्यात आला. या वेळी रविकांत तुपकर म्हणाले की, या आरपारच्या आंदोलनात आपला जीव गेला तरी बेहत्तर पण आता सोयाबीन, कापूस उत्पादकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही. विदर्भ, मराठवाडा व खान्देशच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही लढलो आहे.

तर आता  कापूस व सोयाबीनचा प्रश्न घेऊन आंदोलनाचा भडका उडवणार आहोत. बुलडाण्यातून हा एल्गार पुकारला आहे. त्यासाठी आता तुम्हीही हाताची वज्रमूठ करून या आंदोलनात सहभागी व्हा, कारण १२ नोव्हेंबरपासून हे आंदोलन पेटणार आहे. तेव्हा शासनालाही तोपर्यंत या पिकाला भाव देण्याची संधी आहे, असा इशारा स्वाभिमानीचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

सोयाबीनचा प्रतिक्विंटल दर किमान ८ हजार व कापसाचे दर किमान १२ हजार स्थिर राहावे यासाठी केंद्र सरकारने तत्काळ धोरण आखावे, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून अतिवृष्टिग्रस्तांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, मागील वर्षीचा व चालू वर्षाचा शंभर टक्के पीकविमा देण्यासाठी कंपन्यांना बाध्य करावे, अशा प्रमुख मागण्या या वेळी रविकांत तुपकरांनी लाऊन धरल्या.

महत्वाच्या बातम्या –