Iron-Rich Fruits | निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ आयरनयुक्त फळांचा समावेश

Iron-Rich Fruits | टीम कृषीनामा: शरीरामध्ये माफक प्रमाणात आयरन असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आयरन शरीरातील हिमोग्लोबिन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. आयरन लाल रक्तपेशींमध्ये आढळणारा पदार्थ आहे, जो शरीराच्या पेशींमध्ये ऑक्सिजन वाहून नेतो. शरीरात आयरनची कमतरता असल्यास त्वचा फिकट पडणे, थकवा येणे, झोप न येणे, अस्वस्थता आणि अशक्तपणा जाणवायला लागतो. त्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक वेगवेगळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र, ही औषधे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे शरीरातील आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील फळांचा समावेश करू शकतात.

टरबूज (Watermelon-Iron-Rich Fruits)

टरबूज आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फॉलिक ऍसिड, प्रोटीन आणि विटामिन सी आढळून येते. त्याचबरोबर टरबुजाचे नियमित सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि शरीर निरोगी राहते. त्यामुळे आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात टरबुजाचा समावेश करू शकतात.

डाळिंब (Pomegranate-Iron-Rich Fruits)

डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, पोटॅशियम, जस्त, आणि आयरन आढळून येते. त्यामुळे डाळिंबाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. डाळिंबाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात डाळिंबाचा समावेश करू शकतात.

अननस (Pineapple-Iron-Rich Fruits)

निरोगी राहण्यासाठी अननस उपयुक्त ठरू शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, सोडियम, विटामिन सी आणि आयरन आढळून येते. अननसाचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. त्याचबरोबर या फळाचा आहारात समावेश केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन वाढते आणि थकवा दूर होण्यास मदत होते.

सफरचंद (Apple-Iron-Rich Fruits)

सफरचंदाचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम इत्यादी घटक आढळून येतात. त्यामुळे नियमित सफरचंदाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि पचनसंस्थाही निरोगी राहते. त्याचबरोबर सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

शरीरातील आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील फळांचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.

लिंबू पाणी (Lemon water-For Digestive System)

लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि शरीराची पीएच पातळी देखील वाढवते. त्याचबरोबर लिंबामध्ये आढळणारे सायट्रिक ऍसिड शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात, जे पचन सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. यासाठी तुम्हाला रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करावे लागेल. दररोज याचे सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकतो.

बडीशेप पाणी (Fennel water-For Digestive System)

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपच्या पाण्याचे सेवन करू शकतात. बडीशेपमध्ये फायबर, झिंक, आयरन, पोटॅशियम यासारखे घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे बडीशेपचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत राहण्यास मदत होते. त्याचबरोबर बडीशेपच्या पाण्याचे सेवन केल्याने आम्लपित्तसारख्या समस्या देखील कमी होऊ शकतात. त्याचबरोबर या पाण्याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहू शकते.

मेथी दाण्याचे पाणी (Fenugreek seed water-For Digestive System)

मेथी दाण्यांमध्ये अनेक पोषक गुणधर्म आढळून येतात. यामध्ये विटामिन सी, फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन यासारख्या घटकांचा समावेश आहे. मेथीदाण्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचन संस्था निरोगी राहते. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथी दाणे टाकून पाणी उकळून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे पाणी गाळून कोमट करून त्याचे सेवन करावे लागेल. दररोज या पाण्याचे सेवन केल्याने बद्धकोष्टता आणि अपचनाच्या समस्या दूर होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Periods Mood | मासिक पाळी दरम्यान मुड स्विंग टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Glowing Skin | त्वचेला चमकदार बनवण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Periods Cramps | मासिक पाळीतील असाह्य वेदनांपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Digestive System | पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पेयांचा समावेश

Hair Fall | ‘या’ गोष्टी थांबवू शकतात केस गळती, जाणून घ्या