Coconut Oil Disadvantages | चेहऱ्याला नियमित खोबरेल तेल लावत असाल, तर सावधान! होऊ शकतात ‘हे’ नुकसान

Coconut Oil Disadvantages | टीम कृषीनामा: खोबरेल तेल आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर केला जातो. कारण खोबरेल तेलामध्ये अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेची संबंधित समस्या सहज दूर करतात. मात्र, खोबरेल तेल नियमित चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. होय! खोबरेल तेल त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. खोबरेल तेलाचा जास्त प्रमाणात वापर केल्याने त्वचेला पुढील दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

पिंपल्स वाढू शकतात

जर तुमच्या त्वचेवर आधीपासूनच पिंपल्स असतील तर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर टाळायला पाहिजे. तुमची त्वचा जर साफ असेल तर तुम्ही खोबरेल तेल लावू शकतात. मात्र चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग असलेल्या लोकांनी खोबरेल तेलाचा वापर टाळावा. कारण खोबरेल तेलाच्या वापराने (Coconut Oil Disadvantages) पिंपल्स वाढण्याची शक्यता अधिक असते.

चेहरा तेलकट होतो

ज्या लोकांचा चेहरा नैसर्गिकरित्या खूप तेलकट आहे. त्यांनी खोबरेल तेलाचा वापर टाळला पाहिजे. कारण खोबरेल तेल लावल्याने त्वचा (Coconut Oil Disadvantages) अधिक तेलकट होऊ शकते. परिणामी चेहऱ्यावर मुरुमांची समस्या वाढू शकते.

त्वचेवरील केसांची समस्या वाढते

तुमच्या चेहऱ्यावर जर केस असतील, तर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर टाळला पाहिजे. कारण खोबरेल तेलाने या केसांना पोषण मिळून त्यांची वाढ होते. या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर खोबरेल तेल लावणे (Coconut Oil Disadvantages) थांबवले पाहिजे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Teeth Care | दातांवरील पिवळेपणा दूर करण्यासाठी करा ‘या’ पद्धती फॉलो

UPSC Recruitment | सरकारी नोकरीची संधी! UPSC यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Calcium Deficiency | शरीरामध्ये कॅल्शियमची कमी जाणवत आहे? तर आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Travel Guide | सुट्टी साजरी करण्यासाठी शांत जागा शोधत आहात? तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट

HPCL Recruitment | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू