जाणून घ्या; पाणी कसं आणि केव्हा प्यावं?

आपल्या सर्वाना पाणी आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे, हे तर माहितच आहे. जर योग्य पद्धतीने आपण पाणी प्यायलो तर आपल्या शरीरातील वात आणि कफ या दोन्हीही दोषांचे संतुलन होईल. यामुळे अनेक आजारांपासून आपले रक्षण होईल.

आपण रोज सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी दोन-तीन ग्लास पाणी प्यावं. आपण या पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मध घालून प्यायल्याने देखील चांगला फायदा होतो. यानंतर हे पाणी प्यायल्यानंतर एक तास नाश्ता करू नये. यामुळे रक्तातील, आतड्यातील अनावश्यक घटक निघून जातात.

तसेच यामुळे पचनशक्ती सुधारते आणि पोट देखील साफ होईल. त्याच बरोबर वजन कमी होण्यास आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. याच प्रमाणे रक्त शुद्ध झाल्याने आपल्या त्वचेचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होईल. आपली त्वचा निरोगी होईल.

जर आपण रोज सकाळी उठून व्यायाम करत असाल तर व्यायाम करण्याच्या १० मिनिट आधी १ ग्यास पाणी प्यावं यामुळे तुमची उर्जा वाढण्यास मदत होईल. यानंतर व्यायाम करून झाल्यानंतर २० मिनिटांनी पाणी प्यावं.

महत्वाच्या बातम्या –

हिवाळ्यात आकर्षक त्वचा मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

कृषी सहायकांच्या रिक्‍त पदांमुळे वाढली कृषी विभागाची कसरत

जाणून घ्या काय आहेत ठिबक सिंचनाचे फायदे….