उन्हाळ्यात तुम्ही निरोगी राहण्यासाठी काय कराल ? जाणून घ्या

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.या उष्ण व कोरड्या ऋतूत प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे असते. अन्यथा,उन्हाचा त्रास होऊन उष्माघातासारखी गंभीर घटनाही होऊ शकते. त्यामुळेच,वाढत्या तापमानाचा सामना करणे गरजेचे असते.उन्हाळ्यात निरामय आरोग्यासाठी

खालील गोष्टींची काळजी अवश्य घ्या…

  • उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज इतर कोणत्याही ऋतूंपेक्षा अधिक असते.त्यामुळे दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
  •  दिवसभरातून पाण्याबरोबरच लिंबू सरबत,ताक,लस्सी,नीरा,शहाळे आदी द्रव पदार्थांचे प्रमाणही वाढवावे.त्यातून शरीराला पाण्याव्यतिरिक्त आवश्यक असणारे घटकही मिळू शकतात.
  • उन्हाळ्यात कलिंगड,खरबूज,द्राक्षे आदी रसदार फळे खावीत.कलिंगडामध्ये पाणी आणि कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.खरबूजामध्ये अ,क जीवनसत्त्वे,लोह,सोडिअम,पोटॅशिअम असते.
  • उन्हाळ्यात पचनशक्ती कमी झालेली असते.त्यामुळे,पचायला हलका आहार घ्यावा.त्याचप्रमाणे,उष्ण व कोरड्या ऋतूचा त्रास टाळण्यासाठी  मांसाहार,तिखट व मसालेदार पदार्थही टाळावेत.तसेच चहा,काॅफीबरोबरच मद्यसेवनही टाळावे.
  • उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये.साधारनपणे दहा मिनिटे शांत बसल्यावर सावकाश घोटघोप पाणी प्यावे.माठातील नैसर्गिकरीत्या झालेले थंड पाणी प्यावे.

महत्वाच्या बातम्या –