जाणून घ्या, कशी बनवायची आपल्या आवडीची आरोग्यदायी सोलकढी

सोलकढी हा प्रकार घरी बनवला तर जास्तीत जास्त आरोग्यदायी आहे. एवढ्यात अनेकांना सोलकढी प्यायला मिळाली नसेल म्हणून खास आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आरोग्यदायी सोलकढीची रेसिपी.

सोलकढीचे साहित्य :

१०-१२ आमसुले किंवा १ टेबलस्पून कोकम आगळ
एक नुकताच खोवलेला नारळ

२-३ हिरव्या मिरच्या, ३-४ लसूण पाकळ्या
मीठ साखर कढीपत्ता कोथिंबीर

सोलकढी कशी करावी :

  • आमसुले पाण्यात एक दीड तास भिजत ठेवावीत व न कुस्करता काढून टाकावीत.
  • नारळ खोवून त्याचे जाड व पातळ दूध काढावे.
  • हिरव्या मिरच्यांचे, लसणीचे बारीक बारीक तुकडे करावेत. कढीपत्ता कोथिंबीर बारीक चिरावी. किंवा मिरची लसूण कढीपत्ता कोथिंबीर यांची एकत्रित पेस्ट करूनही वापरता येते.
  • नारळाचे काढलेले दूध व आमसुलाचे पाणी एकत्र करून त्यात वरील बारीक चिरलेला अथवा पेस्ट केलेला मसाला घालावा.
  • कोकम आगळ वापरलेलं असल्यास नारळाच्या दुधात आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून त्यात आगळ घालावे.
  • मीठ साखर घालावी.

सोलकढीला फोडणी नाही दिली तरीही छानच लागते. लसूण चालत नसल्यास नाही घातला तरी हरकत नाही. जिऱ्याची पूड घालायची असेल तर मात्र अगदी वाढतानाच घालावी. आधीपासून घातली तर रंग बदलतो.

महत्वाच्या बातम्या –