जाणून घ्या हळदीचे फायदे….

आरोग्यासाठी हळद फार गुणकारी आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा हळदीचे प्रमाण फार असते. हळदीच्या वापराने त्वचा नितळ मुलायम आणि सुंदर होते. आपल्याकडे नेहमीच म्हणतात ‘पी हळद आणि हो गोरी’. जेवणात वापरण्यात येणाऱ्या अनेक घटकांना एकप्रकारचं संरक्षण हळदीच्या वापरामुळे प्राप्त होत असतं, कारण हळद ही जंतुनाशक आहे.

हळदीचे पाणी नियमितपणे प्यायल्यास फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत होते.

शरीराच्या शुद्धीकरणासाठी गरम पाण्यात लिंबू, हळद आणि मध टाकून प्यायला पाहिजे.

जाणून घ्या किवी खाण्याचे फायदे

रिसर्च नुसार हळद रोज खाल्याने पित्त वाढते त्यामुळे जेवण पचण्यात मदत होते.

हळदीचे पाणी प्यायल्याने रक्त गोठत नाही. रक्त साफ होण्यासही मदत होते.

हळद औषध म्हणून काम करते, शरीरातील सूज कमी करण्यासाठी याची मदत होते.

सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्याचे काय आहेत फायदे , घ्या जाणून …

तुम्ही सकाळी गरम पाण्यात हळद टाकून प्यायले तर तुमची बुद्धी तल्लख राहते.

हळदीत करक्युमिन असल्याने गुडघ्याचे दुखणे आणि सूज दूर करण्यात औषधापेक्षा अधिक काम करते.