अळूची पाने खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

अळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. अळू ही कंदमूळ प्रकारात मोडणारी, अरॅशिए सुरण कुळातील वनस्पती आहे. मुळात आग्नेय आशियातली ही वनस्पती आता आफ्रिका व आशिया खंडांतील उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये सर्वत्र आढळते. अळू बारमाही उगवणारा असून, याची पाने व कंद खाण्याजोगे मानले जातात. अळू ही एक औषधी वनस्पती मानली जाते. चला तर मग जाणून घ्या काय आहेत याचे फायदे.

जाणून घ्या काजू खाण्याचे हे फायदे

  • अळूची पाने वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. या पानांमध्ये असणारे फायबर पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • शक्तपणा दूर करण्यासाठी अळूची पाने ही प्रभावकारी ठरतात.
  • अळूची पाने शरिरात रक्त वाढवण्यास मदत करतात.
  • तुम्हाला पोटांच्या कोणत्याही समस्या त्रास देत असतील, तर अळूच्या पानांचे सेवन तुमच्या त्रासावर फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होते.
  • अळू थंड असल्याने ते वात, पित्त, कफ नाशक असतात.
  • तुम्हाला जर सांधेदुखीचा जास्त त्रास असेल, तर  दररोज अळूच्या पानांचे सेवन करणे तुमच्या त्रासासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुम्हाला सांधेदुखीवर आराम मिळेल.

महत्वाच्या बातम्या –

मैदा आणि मैद्याचे पदार्थ खाताय ? हे नक्की वाचा

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे