कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मक्याची पाहणी

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते. गेल्या महिना-दीड महिन्यापूर्वी लावलेल्या मका पिकावर अमेरिकन लष्कर अळी या कीडची लागण झाल्याने मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले.

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्कर अळीची लागण झाल्याने बुधवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावागावात जाऊन मका पिकाची पाहणी केली.

तालुका कृषी अधिकारी श्याम जोशी, तंत्र अधिकारी विश्वास बर्वे, कृषी पर्यवेक्षक एस. पी. चौधरी यांनी गुरुवारी सकाळपासून गावांमध्ये भेट देऊन मका पिकाची पाहणी केली. मका पिकाला लागलेली अमेरिकन लष्कर अळी कीडबाबत करावयाच्या उपाययोजना, औषध फवारणी, निगा व काळजी याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

अमेरिकन लष्कर अळीचे मका व मधुमका (स्वीट कॉर्न) हे आवडते पीक असून, ही कीड रातोरात वाऱ्याच्या वेगाने पसरत असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.अमेरिकन लष्कर आळी अमेरिकेतून दक्षिण आफ्रिकेमध्ये आली होती. २०१६-१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून ही कीड कर्नाटकात आली. तेथून ही कीड गेल्यावर्षी कोल्हापुरात आली. यंदाच्या वर्षी उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात या अमेरिकेन लष्कर आळी किडीची लागण झाली आहे.

आवळ्याचे विविध पौष्टीक पदार्थ

सुधारित पद्धतीने करा केळी लागवड