Share

उडीद डाळ वापरून असा बनवा घरी फेसपॅक

Published On: 

उडीद डाळ वापरून असा बनवा घरी फेसपॅक

🕒 1 min read

चमकदार आणि सुंदर त्वचा सर्वांनाच आवडते. पण, आपल्या त्वचेची काळजी घेणे तितके जमत नाही. पण, बऱ्याचदा आपण घरगुती उपायही वापरतो. मग आपल्या स्वयंपाकघरातही अशा काही गोष्टी आणि वस्तू असतात ज्यांचा वापर करून तुम्ही फेसपॅक करून चेहऱ्याची आणि त्वचेची काळजी घेऊ शकता.अशीच एक घरातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उडीद डाळ. उडीद डाळ ही त्वचेची जास्त काळजी घेऊ शकते. त्वचेच्या बाबतीत जर काही समस्या असतील तर उडीद डाळ वापरून तुम्ही घरच्या घरी फेसपॅक बनवा.

विद्यार्थ्यांनी केले कुलगुरू कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

अर्धा कप उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट बनवा.

या पेस्टमध्ये 2-2 चमचे दूध आणि तूप घालून व्यवस्थित मिक्स करा.

त्यानंतर ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा आणि कमीत कमी 30 मिनिटे तसेच ठेवा.

अवकाळी निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची शेतकऱ्यांची मागणी

हलक्याशा गरम पाण्याने चेहरा धुवा.

चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून तीन वेळा करून पाहू शकता. नक्कीच बदल दिसून येईल.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याआरोग्य

Join WhatsApp

Join Now
उडीद डाळ वापरून असा बनवा घरी फेसपॅक

🕘 संबंधित बातम्या