असे बनवा मिल्क पावडरने फेसपॅक

असे बनवा मिल्क पावडरने फेसपॅक mlik powder

आताच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर त्याच प्रमाणे चेहऱ्यावर होताना दिसत आहे. टॅनिंग, पिंपल्स, पिंगमेंटेशन, ब्लॅकहेड्स यांसारख्या समस्यांनी त्रासले असाल तर एक फेसपॅक अत्यंत फायदेशीर ठरेल. यासाठी मिल्क पावडरने असे बनवा फेसपॅक.

आता कृषिमंत्री जाणार दर १५ दिवसांनी शेतकऱ्यांच्या शेतावर

-केसर असल्यास मिल्क पावडरमध्ये मिसळा आणि पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ स्वच्छ पाण्यात धुवा.

-मुलतानी माती आणि मिल्क पावडर समान प्रमाणात घ्या. त्यात पाणी घालून त्याची पेस्ट बनवा. गुलाबपाण्याचे काही थेंब घाला. त्यानंतर चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

हिवाळ्यामध्ये गरमऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करा

-निस्तेज त्वचेवर तजे आणण्यासाठी चमचाभर मिल्क पावडरमध्ये दोन चमचे लिंबाचा रस घाला. नंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावा. सुकल्यावर पाण्याने स्वच्छ धुवा.

-पिंपल्सने त्रासले असाल तर मिल्क पावडरमध्ये मध आणि गुलाबपाणी घाला. पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.