‘या’ घरगुती उपायांनी मिळवा डार्क सर्कल्सपासून सुटका, जाणून घ्या

चेहऱ्याचं सौंदर्य आकर्षक डोळ्यांमध्येच दडलेलं असतं. पण डोळ्यांखालील डार्क सर्कल्स अधिकाअधिक वाढत गेले तर चेहऱ्याचं सौंदर्यच नाहीसं होतं. डार्क सर्कल्सपासून सुटका हवी असेल तर काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय करणं फार गरजेचं आहे.

काकडी शरीरासाठी थंड असते. ती खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढण्यास मदत सुद्धा होते. काकडीचे छोटे छोटे स्लाईस करुन 20 मिनिट डोळ्यांवर ठेवले तर डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होतात. त्याचबरोबर थकलेल्या डोळ्यांना आरामसुद्धा मिळतो. काकडी आणि लिंबाचा रस एकत्रित करून डोळ्याखाली 20 मिनिटांपर्यंत लावून ठेवावा. त्यामुळे डोळे अधिकच आकर्षक वाटतील.

बटाट्याचे छोटे स्लाईस किंवा कच्च्या बटाट्याचा रससुद्धा डोळ्याभोवतीचे डार्क सर्कल्स कमी करण्यास मदत करतात. चेहरा अधिकाधिक खुलून दिसावा यासाठी तुम्ही बदामाचा वापरसुद्धा करू शकता. 1 चमचा बदाम पेस्ट आणि दूध यांचं एकत्रित मिश्रण डोळ्यांखाली लावलं तर नक्कीच डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी होऊन चेहऱ्याचं सौंदर्य खुलून दिसेल.

एक चमचा गुलाब पाणी, दोन मोठे चमचा दही आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस एकत्रित करुन ते मिश्रण डोळ्यांखाली लावावं. त्यानंतर ते थंड पाण्याने धुवून साफ पुसावं. त्यामुळे डार्क सर्कल्सपासून सुटका होण्यास मदत होईल. टोमॅटो आणि लिंबाचा रस एकत्रित करून डोळ्यांभोवती लावावा. टोमॅटोमुळे चेहऱ्याचा ग्लोसुद्धा वाढतो. गुलाब त्वचेसाठी फार उपयुक्त असतं. म्हणूनच गुलाबाच्या पाकळ्या आणि दूध याची एकत्रित पेस्ट डोळ्यांभोवती लावावी.

महत्वाच्या बातम्या –