Share

देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरु

Published On: 

देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरु

🕒 1 min read

नवी दिल्ली – देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी (Vaccination) आजपासून म्हणजेच १ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. यासाठी आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी करता येणार आहे. तर नोंदणीसाठी इयत्ता दहावीचे ओळखपत्रदेखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.

दरम्यान येत्या ३ जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल वेगळी असणार आहे.

भारत सरकारने लहान मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे.भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila’s ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे. दरम्यान रजिस्ट्रेशनसाठी पूर्वीसारखीच पद्धत वापरली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल अशा विध्यार्थ्यांना त्यांचे शाळेचे ओळखपत्र देखील वापरता येणार आहे. https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या

Join WhatsApp

Join Now
देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून रजिस्ट्रेशन सुरु

🕘 संबंधित बातम्या