Share

‘देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मान झुकवली आहे’; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Published On: 

‘देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मान झुकवली आहे’; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

🕒 1 min read

नवी दिल्ली – नरेंद्र मोदींनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली.  शेतकऱ्यांना समजवण्यात आम्ही कमी पडलो असे म्हणत मोदींनी देशाची माफी मागीतली. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन संपवून घरी परत जावे, असे अवाहनही मोदींनी आपल्या भाषणातून केले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचं सरकार सेवा भावनेतून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे. अनेक पिढ्या जे स्वप्न पाहत होत्या ती स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत. माझ्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवल्या आहेत.

या तीन कृषी कायद्यांचे फायदे आपलं सरकार सामान्य शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलं नाही. असं म्हणत पंतप्रधान मोदीनी देशाची क्षमाही मागितली. सोबतच वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मोदींनी केली आहे. यावर आता राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

 

राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मान झुकवली आहे. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन! जय हिंद, जय हिंद किसान!’, असे म्हणत शेतकऱ्यांच्या लढ्याला मिळालेल्या यशाचे अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याराजकारण (Politics)

Join WhatsApp

Join Now
‘देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मान झुकवली आहे’; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया

🕘 संबंधित बातम्या