देशात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून सुरवात

नवी दिल्ली – देशात कोरोनाचे (corona)  रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. तर राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.  देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी  (vaccination) आजपासून म्हणजेच ३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.  दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. यासाठी कोविन अ‍ॅपवर नोंदणी करता येणार आहे. तर नोंदणीसाठी इयत्ता दहावीचे ओळखपत्रदेखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.

दरम्यान रविवारी ११ वाजेपर्यंत ८ लाख मुलांकडून लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली. अशी माहिती कोवीन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींनी १५ ते १८ वयोगटातील मुलांनी लसीकरण करावे असे आवाहन केले आहे.

दरम्यान लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल वेगळी असणार आहे.भारत सरकारने लहान मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे.भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila’s ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे. दरम्यान रजिस्ट्रेशनसाठी पूर्वीसारखीच पद्धत वापरली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल अशा विध्यार्थ्यांना त्यांचे शाळेचे ओळखपत्र देखील वापरता येणार आहे. https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –