राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध; जाणून घ्या नवी नियमावली

मुंबई – राज्यात कोरोनाचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉनचे रुग्ण देखील वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यात लाकडाऊन लागेल का, असा प्रश्न सर्वांना पडला होता. याबाबत राज्य पातळीवर अनेक बैठका सुद्धा सुरु होत्या. दरम्यान राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्री ११ ते सकाळी ५ हा नाईट कर्फ्यू असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.आज मध्यरात्रीपासून हे नियम लागू होती.

राज्यात उद्या मध्यारात्रीपासून रात्री  ११ ते सकाळी ५ पर्यंत सर्वत्र संचारबंदी  तर दिवसा जमावबंदी असेल. यामध्ये ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी असेल. रात्री अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यावर निर्बंध (Restrictions) लावण्यात आले आहेत.

काय सुरु काय बंद?

  • प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच  ऑफिसेसमध्ये ५० टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही.
  • अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी २० जणांना परवानगी
  • लग्न समारंभासाठी ५० जणांना परवानगी देण्यात आली आहे.
  • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी ५० जणांना परवानगी असेल
  • स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद राहतील. तर हेअर कटिंगची दुकाने ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी असेल. रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील
  •  राज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत
  • रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री १० ते सकाळी ५ हॉटेल  बंद राहणार आहेत. यादरम्यान होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे.
  • शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
  • नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. यामध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्यांना परवानगी असेल. मात्र रात्री १० ते सकाळी ८ सिनेमागृह  बंद असतील
  • पर्यटन स्थळे, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –