Share

जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार

Published On: 

जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार

नाशिक गेल्या दोन महिन्यात हजाराच्या घरात असलेली रूग्णसंख्या नवरात्र, दसरा दिवाळी नंतरही ४०० च्या आसपास स्थिर असून हे चांगले संकेत असून यात जिल्ह्यातील राबवलेल्या लसीकरण मोहिमेचा  मोठा परिणाम आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार आहे. तसेच लसीकरणासाठी कठोर उपाययोजना करण्याची इच्छा नाही. परंतु जनतेने सहकार्य न केल्यास तशी पावले उचलावी लागतील, त्यामुळे जनतेने स्वत:हुन पुढाकार घेण्यासह प्रशासनाने ही मोहीम घरोघरी पोहोचवावी असे कळकळीचे आवाहन आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

ते जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ शहर पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिंग आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, ११ सप्टेंबर २०२१ रोजी रूग्णसंख्या ९०४ इतकी होती. २३ सप्टेंबर २०२१ रोजी ती १ हजार ३५ झाली. २४ ऑक्टोबरला रूग्णसंख्या ७१७ होती, त्यानंतर ही संख्या ६५० ते ७०० च्या दरम्यान असायची ती कमीकमी होत आज रोजी ४६१ पर्यंत कमी झालीय. सण, उत्सवांच्या कालावधीनंतरची ही कमी होणारी आकडेवारी चांगले संकेत देणारी व कोरोनामुक्तीसाठी आशादायक चित्र निर्माण करणारी आहे. अर्थात यांत जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणीकरण होत असलेले लसीकरणाचा मोठा वाटा आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणाला गती देण्यासाठी औरंगाबादसारख्या कुठल्याही कठोर उपाययोजना राबवण्याची शासन प्रशासनाची इच्छा नसून मात्र जनतेने सहकार्य न केल्यास नाईलाजास्तव त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात.  त्यासाठी जनतेने स्वतः पुढाकार घेवून या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे आवाहन करताना ग्रामीण व आदिवासी बहुल भागात घरोघरी लसीकरण पोहोचविण्याकरिता प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी आरोग्य प्रशासनाला यावेळी दिले आहेत.

ऑक्सिजन क्षमता ६०० मेट्रिक टन होणार

जिल्ह्यात कोरोनापूर्वी ८ मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता होती. ती दुसऱ्या लाटेत १३८ ते १४० मेट्रिक टन इतकी झाली, आज  ३५६ मेट्रिक टन इतकी आहे. येणाऱ्या काही दिवसात ती ६०० मेट्रिक टन इतकी होणार असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या –  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
बातम्याराजकारण (Politics)

Join WhatsApp

Join Now
जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार

🕘 संबंधित बातम्या