राज्यात एक असंही गाव आहे; ‘या’ गावात चहा कधीच विकला जात नाही

गाव म्हटलं की छोट्या मोठ्या हॉटेल आल्या. तिथे चहाची हॉटेल असतेच. पण राज्यात असेही गाव आहे की, जिथे चहा विकला जात नाही. कोकणातील एखादा उत्सव असो किंवा कार्यक्रम अथवा गावातील जत्रा, त्यात चहाचा स्टॉल किंवा हॉटेल तुम्हाला दिसणार नाही असं सांगितलं तर तुमचा विश्‍वास बसणार कधीच बसणार नाही. पण असं  एक गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. वेंगुर्ले तालुक्‍यातील मातोंड हे ते गाव. या गावात कधीच चहा विकला जात नाही. गावातच नव्हे, तर गावाबाहेरही मातोंडमधील व्यक्ती चहाचा स्टॉल घालून चहा विकणार नाही. शेकडो वर्षांची ती परंपरा अनेक पिढ्यांनंतर आजही कायम आहे.

पोस्ट खात्यात मोठी भरती; 10 वीच्या गुणांवर होणार भरती

मातोंड हे सावंतवाडी आणि वेंगुर्ले सीमेवरचे तळवडेलगतचे गाव. गावात सगळ्या जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. या गावातील अनेक व्यक्ती उच्च पदावर आहेत. गावात अनेक मंदिरे, प्राथमिक, माध्यमिक शाळा आहे. गावात सुशिक्षित कुटुंबे सर्वाधिक. अनेकजण व्यवसाय नोकरीनिमित्त बाहेर आहेत; पण गावात आला आणि चहा पिण्याची लहर आली तर तुम्हाला चहाचा स्टॉल गावात आढळणार नाही.

१५ सप्टेंबरपर्यंत पीककर्ज वाटपासाठी मुदतवाढ

दिवसागणिक चहा पिणाऱ्यांची संख्या वाढणारी तशीच चहा विक्रीच्या स्टॉल्सची संख्याही वाढणारी. आज अनेक इंजिनिअर अथवा उच्चपदस्थ तरुण नोकरीचा मार्ग सोडून वेगवेगळ्या फ्लेवरच्या चहाचे कॉर्नर शहरात सुरू करून लाखोंची कमाई करत आहेत. महाराष्ट्रातील चहाला इतक्‍या उच्च दर्जाचे स्टेटस्‌ जगभरात प्राप्त झाले आहे. असे असले तरी मातोंडमध्ये चहा विकणे मात्र निषिद्ध आहे.

महत्वाच्या बातम्या –

‘ही’ भाजी खाणे आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते, जाणून घ्या फायदे

चिंच खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या