Amla Benefits | रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Amla Benefits | टीम कृषीनामा: आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आढळून येतात. आवळ्यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात. आवळा आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्यामुळे बहुतेक लोक त्यांच्या आहारात आवळ्याचा समावेश करतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही आवळा, आवळ्याचा मुरब्बा, आवळ्याचा रस इत्यादी गोष्टींचा आहारात समावेश करू शकतात. सकाळी रिकाम्या पोटी या गोष्टीची सेवन केल्याने तुम्हाला अनेक आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. आवळ्याचे रिकाम्या पोटी सेवन केल्याने शरीराला पुढील फायदे मिळू शकतात.

रोगप्रतिकारशक्ती शक्ती मजबूत होते (The immune system is strengthened-Amla Benefits)

रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे शरीराला संसर्गजन्य रोगापासून दूर ठेवण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने किंवा आवळ्याचा रस प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते. रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने तुम्ही सर्दी-खोकल्यापासून दूर राहू शकतात.

हाडे मजबूत होतात (Bones become stronger-Amla Benefits)

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. आवळा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. आवळ्यामध्ये पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात आढळून येते, जे शरीराच्या स्नायूंसाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत ठेवण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन करू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Amla Benefits)

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारू शकते. त्याचबरोबर रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने बद्धकोष्टता आणि ऍसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळू शकतो.

सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर शरीरातील अतिरिक्त चरबीपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही जिरा पाण्याचे पुढील पद्धतीने सेवन करू शकतात.

जिरा पाणी आणि कढीपत्ता (Cumin water and curry leaves-For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी जिरा पाणी आणि कढीपत्ता उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला रात्रभर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरे आणि सात ते आठ कढीपत्ता टाकून ठेवावा लागेल. त्यानंतर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तुम्हाला या पाण्याचे सेवन करावे लागेल. हे पेय प्यायल्याने शरीरातील मेटाबोलिझम रेट वाढण्यास मदत होते. परिणामी वजन कमी होऊ शकते.

जिरा पाणी आणि दालचिनी (Cumin water and lemon-For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी दालचिनी आणि जिरा पाणी उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा जिरे आणि दालचिनीचा एक तुकडा मिसळून घ्यावा लागेल. तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या पाण्याचे उकळून सेवन करू शकतात. या पाण्याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Workout Tips | थकवा दूर करण्यासाठी वर्कआउटनंतर करा ‘या’ हेल्दी स्नॅक्सचे सेवन

Green Grapes | हिरव्या अंगुराचे सेवन केल्याने आरोग्याला मिळू शकतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Rose Health Benefits | फक्त प्रेमासाठी नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे गुलाब, जाणून घ्या

Curd And Sugar | दह्यामध्ये साखर मिसळून खाल्ल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Skin Care With Herbs | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी करा ‘या’ औषधी वनस्पतींचा वापर