यवतमाळमध्ये शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणी करण्याची वेळ ; ९० टक्के शेतकरी अडचणीत

मराठवाड्यातील खरिपावर पुन्हा एकदा संकटाचे ढग गडद होताना दिसत असून, विदर्भातही शेतकरी हवालदिल होताना दिसत आहे .जुलै महिना संपत आला तरी पावसाचा खंड वाढतच असल्याने यवतमाळ जिल्ह्यात पिके करपली आहेत. त्यातच कापूस, सोयाबीन पिकांच्या पेरणीचा कालावधीही उलटून गेल्याने जिल्ह्यातील  शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. अशी परिस्थिती विदर्भातील अन्य जिल्ह्यांतही दिसून येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात ९ लाख २१ हजार हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून त्यापैकी ९६ टक्के पेरण्या झाल्या आहे. यात सर्वात जास्त ४ लाख ५३ हजार हेक्टरवर कापूस, २ लाख ४४ हजार हेक्टरवर सोयाबीन आणि १ लाख २१ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली आहे. दरम्यान, ऐन हंगामात संपूर्ण जुलै महिनाभर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणी करण्याची वेळ येण्याची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

अर्थसंकल्प : राज्याच्या इतिहासात प्रथमच शेळी व मेंढ्यांसाठी चारा छावण्या उभारण्याचा निर्णय

Budget 2019 : झीरो बजेट शेतीवर आमचा भर – सितारामन