Dead Skin | डेड स्किनच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Dead Skin | टीम कृषीनामा: थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेवरील चमक कमी होते. कारण या दिवसांमध्ये त्वचेवर डेड स्कीनचे प्रमाण वाढते. थंडीच्या दिवसांमध्ये चेहरा, मान, हात, पायांवर डेड स्किन दिसायला लागते. त्यामुळे त्वचेचे सौंदर्य कमी होते. डेड स्क्रीन काढण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर करतात. पण ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकतात. डेड स्किनची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही पुढील उपायांचा वापर करू शकतात.

कोरफड (Aloevera For Dead Skin)

त्वचेवरील डेड स्किन काढण्यासाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला कोरफडीचा गर, मध, तांदळाचे पीठ आणि साखर एकत्र मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर या मिश्रणाने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर स्क्रब करावे लागेल. पंधरा मिनिटे स्क्रब केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाने स्क्रब केल्यास त्वचेवरील डेड स्किनची समस्या कमी होऊ शकते.

कॉफी (Coffee For Dead Skin)

त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी कॉफीचा वापर फायदेशीर ठरू शकतो. यासाठी तुम्हाला एक चमचा कॉफीमध्ये साखर आणि लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या मिश्रणाने हलक्या हाताने त्वचेवर मालिश करावी लागेल. पंधरा मिनिटे मालिश केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या स्क्रबचा वापर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकतात.

मध (Honey For Dead Skin)

डेड स्किनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी मध तुमची मदत करू शकतो. यासाठी तुम्हाला मधामध्ये गुलाब पावडर मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर तयार झालेले मिश्रण तुम्हाला साधारण 30 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. तीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. हे मिश्रण तुम्ही आठवड्यातून दोन वेळा चेहऱ्यावर लावू शकतात. या मिश्रणाच्या वापराने त्वचेवरील घाण साफ होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Periods Pain | मासिक पाळीमध्ये खूप वेदना होत आहेत? तर करा ‘हे’ उपाय

South India Tour | ‘ही’ आहेत दक्षिण भारतातील छोटी पण अतिशय सुंदर ठिकाणं

Black Sesame Benefits | काळ्या तिळाचे सेवन केल्याने शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Job Opportunity | भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती! ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Skin Care With Ice | बर्फाच्या मदतीने चेहऱ्यावरील ‘या’ समस्या सहज होतात दूर