७ प्रकारची भजी बनवायची तरी कशी ? जाणून घ्या

विरेश आंधळकर : पावसाळा म्हटल की लगेच आठवतो तो गरमागरम चहा त्याच्या सोबतीला गरम आणि खमंग भजी. पावसाळ्यामध्ये भजी खाण्यात जो आनंद आहे तो दुसऱ्या कोणत्या खाद्यपदार्थमध्ये नाही. आपल्याकडे टिपिकल मिळणारी भजी म्हणजे कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी पण अजूनही खूप साऱ्या प्रकारांमध्ये आपण भजी बनवू शकतो.  अशाच काही या रेसिपीज आज खास तुमच्यासाठी.  झटपट तयार होणाऱ्या आणि  पावसाळ्याचा आनंद द्विगुणित करणाऱ्या.

कोबीची भजी

साहित्य: 3-4 कप बारीक चिरलेली कोबी, 2 चमचे बारीक चिरलेली भोपळी मिरची , 4 टेस्पून बेसन,  1टेस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर,  2 हिरव्या मिरच्या , 3 लसणीच्या पाकळ्या , 1 टिस्पून जिरे थोडेसे हिंग, हळद, लाल तिखट , कोथिंबीर, बारीक चिरून,  चवीपुरते मिठ , तळण्यासाठी तेल

कृती: प्रथम रलेली कोबी आणि भोपळी मिरची एका भांड्यात एकत्र करावे. त्याला थोडे मिठ चोळावे ज्यामुळे भाज्यांना थोडे पाणी सुटेल. मिरच्या आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरवर वाटून घ्याव्यात. किंवा मिरचीची आणि लसणीची पेस्ट उपलब्ध असेल तर ती वापरावी. मिठ लावलेल्या भाज्यांमध्ये वर दिलेले सर्व साहित्य घालून मिक्स करावे. अगदी थोडे पाणी घालून कांदा भजीला भिजवतो तितपत घट्टसर भिजवावे. तेल गरम करून भिजवलेल्या पिठाची लहान लहान बोंडं तळून घ्यावीत. भजी तळताना मध्यम आचेवर तळावीत नाहीतर भजी आतमध्ये कच्ची राहण्याचा संभव असतो.

२. पनीरची भजी

साहित्य: 250 ग्रा. पनीर,  1 कप बेसन ( डाळीचे पीठ ),  लहान अर्धा चमचा बेकींग पावडर, 1-2 चमचा काळी मिरी, मीठ चवीप्रमाणे, तेल तळण्यासाठी, कोथिंबीरीची चटणी वाढण्याकरता

कृती: बेसन ( डाळीचे पीठ ), मीठ व बेकिंग पावडर, काळी मिरी व पाणी टाकून भिजवावे.  पनीरचे चौकोनी तुकडे करा. मधोमध एक चीर मारुन त्यात हिरवी चटणी लावा. आता पनीरचे तुकडे डाळीच्या पीठात बुडवून गरम तेलात सोडा. लालसर तळून घ्या. भजी खाण्यासाठी तयार आहे. सॉस किंवा चटणी बरोबर गरम-गरम वाढा.

3. पालक – मेथीची भजी

साहित्य:- अर्धी गड्डी पालक आणि अर्धी गड्डी मेथी धुवून चिरून,  2 वाटया बेसन पीठ,  1 चमचा लाल तिखट , पाव चमचा हळद , 2 टेबल स्पून तेल , 1 टेबलस्पून पांढरे तीळ, पाव चमचा ओवा , पाव चमचा सोडा , चवीनुसार मीठ , तळण्याकरता तेल.

कृती:-चिरलेला पालक व मेथी एकत्र करावी. त्यात डाळीचे पीठ, तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, चवीनुसार मीठ घालून २ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालावे. थोडे पाणी घालून पीठ कालवावे. फार पातळ करू नये. कढईत तेल तापवून वरील पिठाची भजी तळावीत.

4. मूग भजी

साहित्य: अर्धा कप पिवळी मूग डाळ , 4-5 हिरव्या मिरच्या , चिरलेली कोथिंबीर,  1 चमचा लसूण पेस्ट, थोडेसे जिरे, हिंग, हळद गरजेप्रमाणे, मिरपूड किंवा १-२ मिरी ठेचून (ऑप्शनल), चवीपुरते मिठ,  तळण्यासाठी तेल

कृती: – मूग डाळ 3-4 तास पाण्यात भिजत ठेवावी. नंतर त्यातील पाणी काढून टाकावे. डाळ पाणी न घालता बारीक वाटून घ्यावी. वाटलेल्या डाळीत बारीक चिरलेल्या मिरच्या, लसूण पेस्ट, कोथिंबीर, जिरे, हिंग, हळद, मिरी आणि चवीपुरते मीठ घालावे. मिडीयम गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे. चमच्याने किंवा हाताने डाळीचे मिश्रणाचे छोटे गोळे तेलात सोडावे. भज्यांना गोल्डन ब्राऊन रंग आला कि थोडावेळ कागदावर / किचन टॉवेलवर अधिकचे तेल

पालक बटाटा भजी

साहीत्य:- दोन मोठे उकडलेले बटाटे, एक बाऊल बारीक चिरलेला पालक, दोन कप बेसन, हिंग, चार टेबलस्पून तांदूळ पीठी, एक चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, थोडी कोथिबिंर, चवीनुसार मीठ, पाव चमचा खायचा सोडा

कृती:– बटाटे कुस्करुन घ्यावेत. त्यात चिरलेला पालक टाकावा. हे मिश्रण एकजीव करुन घ्यावे. त्यात तिखट, मीठ व खायचा सोडा टाकावा. नंतर एका बाऊल मधे बेसन व इतर सर्व साहित्य घालून घ्या.. व पीठ पाणी घालून भिजवा.. पीठ साधारण डोश्याच्या पीठा प्रमाणे ठेवावे. तयार मिश्रण पीठात घालावेत. एक एक करून भजी सोनेरी रंगावर तळून घ्यावी. हिरव्या चटणीबरोबर किंवा नुसतीही छान लागतात

6. मक्याच्या दाण्यांची भजी

साहित्य:- पाच कणसांचे (स्वीट कॉर्न)दाणे, एक चमचा तिखट, एक चमचा मीठ, दिड चमचा गरम मसाला, अडीच वाटी बेसन, तेल.

कृति:-मक्याचे दाणे धुऊन मिक्सरमधुन काढणे, त्यात तिखट,मीठ, गरम मसाला व जेवढे मावेल तेवढेच बेसन व अर्धा डाव तेल गरम करून घालावे. मिश्रण एकत्र करावे. अजिबात पाणी घालू नये. कढईत तेल चांगले तापले की छोटी छोटी भजी तळून घ्यावीत. सॉस बरोबर छान लागतात.

7.पापडाची भजी

साहीत्य…४ उडीदाचे कच्चे पापड़, एक ते दीड कप ताक, एक कप तांदळाचे पीठ, एक चमचा आलं मिर्चीची पेस्ट, थोडी कोथिंबिर, अर्धा चमचा हळद,चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल

कृती:- एका बाऊल मधे पापडाचे तुकडे घेऊन त्यावर ताक घाला, थोडावेळ भिजु द्या. भिजल्यानंतर हाताने कुस्करून घ्या. त्यात आलमिरची पेस्ट, हळद, मीठ घालून त्याचे एकसारखे गोळे बनवा. नंतर गरमगरम तेलात तळून घ्या. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व करा.

महत्वाच्या बातम्या –