मक्याला किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा हमीभाव केंद्रे

औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास १ लाख ९० हजार हेक्टरवर मक्याचे पीक होते. सुरवातीला मक्याच्या पिकावर लष्करी अळीचे आक्रमण झाले होते. लष्करी अळीच्या आक्रमणातून वाचलेल्या मक्याला ऑक्टोबरमधील पावसाने जोरदार धुतले. पावसामुळे मका उत्पादकांचे खूप मोठे नुकसान झाले. अशा मक्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्यामुले शेतकऱ्यांच्या नुकसानीत अजूनच भरच पडली आहे.त्यांना कमीतकमी आधारभूत दर तरी मिळावा, यासाठी जिल्ह्यामध्ये दहा खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गंगापूर, लासूर, वैजापूर, पैठण, कन्नड, खुल्ताबाद, करमाड, फूलंब्री, सोयगाव व सिल्लोड या केंद्रांचा समावेश आहे.

मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी जिल्ह्यात दहा हमीभाव मका खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. या केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी, त्याचप्रमाणे खरेदी करण्यासाठी संबंधित यंत्रणेला ३१ डिसेंबरपर्यंत मका उत्पादकांना संबंधित केंद्रावर नाव नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी त्यांना ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. तसेच त्याच तारखेपर्यंत हमी दराने खरेदीही संबंधित यंत्रणेला करता येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

स्वच्छ व १४ टक्के आर्द्रता असलेले, न डागाळलेले मका पीक या केंद्रांवरून १७६० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी होईल. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात मक्याचे पीकही भिजून त्याला कोंब आले होते. बाजारात येणाऱ्या मक्यात १८ टक्‍क्‍यांपर्यंत आर्द्रता येत आहे. हमी दराने खरेदीसाठी १४ टक्के आर्द्रतेची अट घातली गेली आहे.

महत्वाच्या बातम्या –

वैजापूर येथे मका पिकावरील लष्करी अळीची कृषी विभागातर्फे विद्यापीठातील शास्त्रज्ञांकडून पाहणी

जाणून घ्या बहुउपयोगी कडीपत्याचे फायदे

शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते , कीटकनाशके खरेदी करताना घ्या ही काळजी

आत्महत्येची परवानगी द्या’; बीडच्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी