Share

पालक भाजी खाण्याचे ‘हे’ आहेत जबरदस्त फायदे, जाणून घ्या

Published On: 

पालेभाज्यात अनेक सत्व असतात. मात्र पालेभाज्या खा म्हटलं तर आपलं तोंड वेडवाकडं होतं. निरोगी राहण्यासाठी आपला आहार देखील नीट असायला हवा. डॉक्टर नेहमी आहारात पालेभाज्याचा समावेश करा, असं सांगतात. आपण त्या सल्ल्यांना कधीच गंभीर घेत नाही. पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवी. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे.

  • अनेकांची प्रकृती उष्ण असते. या उष्ण प्रकृतिचा अनेकांना फार त्रासही होतो. त्यांना उष्ण पदार्थ वर्ज केले जातात. त्यासाठी पालक ही फार उपायकारक आहे. पालक शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. विशेष म्हणजे उन्हाळ्यात आपल्या शरिराला थंड ठेवण्याचे काम पालक करते.
  • पालक हे शरिरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून लढण्यास मदत होते. यामुळे टीबी सारख्या आजारांवरदेखील मात करता येते.
  • कॅल्शियमचे शरीरात शोषण होण्यासाठी सी व बी ही जीवनसत्त्वेही पालकात असल्यामुळेच  हाडे, दात व नखांच्या आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करते. ल्युटिन हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत.
  • तसेच कावीळ झालेल्या रुग्णाला पालकाचा आणि कच्च्या पपईचा रस एकत्र दिल्यास आराम मिळेल. लो ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज पालकाच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे रक्तर प्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • पालकमध्ये अनेक सत्वाबरोबरच फोलेटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. विशेषत: पालकमधील फोलेट हा महिलांसाठी जास्त उपयुक्त असतो. त्याने ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करता येतो.
  • पालकमुळे शरीरात हिमोग्लोबिन वाढते. यातील कॅल्शियमने वाढीच्या वयातील मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी पालक लाभदायक ठरते. यामुळे स्मरणशक्ती देखील वाढते.

या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे. पालकामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार, कावीळ, पित्तविकार यामध्ये उपयुक्त आहे.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्य बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या