Glycerine | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी ग्लिसरीनसोबत ‘या’ गोष्टींचा करा वापर

Glycerine | टीम कृषीनामा: ग्लिसरीन बहुतेक सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरले जाते. त्याचबरोबर चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी ग्लिसरीन खूप फायदेशीर मानले जाते. ग्लिसरीनच्या मदतीने त्वचेची संबंधित अनेक समस्यांपासून सहज सुटका मिळू शकतो. ग्लिसरीनमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही थेट ग्लिसरीनचा चेहऱ्यावर वापर करू शकतात किंवा ग्लिसरीनसोबत तुम्ही पुढील गोष्टींचा वापर करून चेहऱ्याची काळजी घेऊ शकतात.

लिंबाचा रस आणि ग्लिसरीन (Lemon juice and Glycerine-For Skin Care)

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन आणि लिंबाच्या रसाचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला पाच ते सहा थेंब ग्लिसरीनमध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यावर तुम्हाला ते चेहऱ्यावर स्प्रे बॉटलच्या मदतीने स्प्रे करावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग दूर होतात आणि काळेपणाही कमी होतो.

मुलतानी माती आणि ग्लिसरीन (Multani Mati and Glycerine-For Skin Care)

ग्लिसरीन आणि मुलतानी मातीच्या मदतीने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे मुलतानी मातीमध्ये आवश्यकतेनुसार ग्लिसरीन आणि गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पाच मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या वापराने त्वचेवरील तेलकटपणा सहज दूर होऊ शकतो.

गुलाब जल आणि ग्लिसरीन (Rose water and Glycerine-For Skin Care)

चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी तुम्ही ग्लिसरीन आणि गुलाबजलचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला दोन-तीन चमचे गुलाब जलमध्ये ग्लिसरीनचे तीन ते चार थेंब मिसळून घ्यावे लागेल. नंतर कापसाच्या मदतीने तुम्हाला हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावावे लागेल. साधारण अर्धा तासानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचा मुलायम, कोमल आणि सुंदर होऊ शकते.

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही ग्लिसरीनचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी तुम्ही खालील सोप्या टिप्स फॉलो करू शकतात.

खोबरेल तेल आणि कढीपत्ता (Coconut oil and curry leaves-For Hair Growth)

केसांच्या वाढीसाठी खोबरेल तेल आणि कढीपत्ता उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये सात ते आठ कढीपत्ते मिसळावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे तेल कोमट करून घ्यावे लागेल. या तेलाने केसांना हलक्या हाताने मसाज केल्यावर केसांच्या वाढीस चालना मिळू शकते. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा या तेलाचा वापर करू शकतात.

मोहरीचे तेल आणि मेथी (Mustard oil and fenugreek seeds-For Hair Growth)

केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल आणि मेथीचा वापर करू शकतात. कारण या दोन्हीमध्ये विटामिन ई, अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टरियल गुणधर्म आढळून येतात, जे केसांची काळजी घेण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या दाण्याची पेस्ट तयार करून मोहरीच्या तेलामध्ये मिसळून घ्यावी लागेल. हे तेल तुम्हाला साधारण एक तास केसांना लावून ठेवावे लागेल. एका तासानंतर तुम्हाला तुमचे केस नियमित शाम्पूने धुवावे लागतील.

खोबरेल तेल आणि कोरफड (Coconut Oil and AloeVera-For Hair Growth)

तुम्ही जर केस वाढवण्याचा विचार करत असाल, तर खोबरेल तेल आणि कोरफडीचे मिश्रण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये आवश्यकतेनुसार कोरफडीचा गर मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण हलक्या हाताने केसांना लावावे लागेल. साधारण एक तास हे मिश्रण केसांवर ठेवल्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. या मिश्रणाच्या मदतीने केस मऊ, लांब आणि चमकदार होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Hair Growth | केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी करा ‘या’ सोप्या टिप्स फॉलो

PM Kisan Yojana | खुशखबर! शेतकऱ्यांना आज ‘या’ वेळी मिळणार पीएम किसान योजनेतील तेरावा हप्ता

Ayurvedic Tips | आंघोळीनंतर त्वचेला खाज सुटू लागल्यावर करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Iron-Rich Fruits | निरोगी राहण्यासाठी आहारात करा ‘या’ आयरनयुक्त फळांचा समावेश

Periods Mood | मासिक पाळी दरम्यान मुड स्विंग टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स