Wheat Flour | नैसर्गिक पद्धतीने त्वचेची काळजी घेण्यासाठी गव्हाच्या पिठाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Wheat Flour | टीम कृषीनामा: गव्हाचे पीठ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर गव्हाचे पीठ आपल्या त्वचेसाठी देखील उपयुक्त ठरू शकते. गव्हाच्या पिठाच्या मदतीने त्वचा चमकदार बनवता येऊ शकते. त्याचबरोबर त्वचेच्या अनेक समस्यांवर गव्हाचे पीठ एक रामबाण उपाय ठरू शकतो. गव्हाच्या पिठामध्ये आढळणारे घटक त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही गव्हाच्या पिठाचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

गव्हाचे पीठ आणि मध (Wheat Flour and Honey- For Skin Care)

त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी गव्हाचे पीठ आणि मध फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा गव्हाच्या पिठामध्ये एक चमचा मध, दोन चमचे गुलाबजल आणि एक चमचा दूध मिसळून घट्ट मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील जळजळ आणि लालसरपणा कमी होऊ शकतो.

गव्हाचे पीठ आणि दूध (Wheat Flour and Milk- For Skin Care)

गव्हाचे पीठ आणि दूध एकत्र करून लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होऊ शकते. या दोन्ही नैसर्गिक गोष्टींच्या मदतीने त्वचेवरील कोरडेपणाची समस्या सहज दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा गव्हाच्या पिठामध्ये चार चमचे दूध मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते.

गव्हाचे पीठ आणि दही (Wheat Flour and Curd- For Skin Care)

गव्हाचे पीठ आणि दही यांच्या मदतीने त्वचेला आतून पोषण मिळू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा गव्हाचे पीठ, एक चमचा दही आणि एक चमचा मध मिसळून घ्यावे लागेल. तुम्हाला हे मिश्रण घट्ट तयार करून घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर दहा मिनिटे लावून ठेवावे लागेल. दहा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने त्वचेवरील पिंपल्सची समस्या देखील दूर होऊ शकते.

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही गव्हाच्या पिठाचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा पुढील पद्धतीने वापर करू शकतात.

टोमॅटो आणि बेसन (Tomatoes and besan-Beauty Tips)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि बेसनाचे मिश्रण चेहऱ्याला लावू शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये दोन चमचे टोमॅटोचा रस मिसळून घ्यावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या मिश्रणामध्ये लिंबाचा रस देखील मिसळू शकतात. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते दहा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.

टोमॅटो आणि चंदन (Tomatoes and sandalwood-Beauty Tips)

त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही टोमॅटोसोबत चंदनाचा वापर करू शकतात. चंदनामुळे त्वचेवरील डाग कमी होतात. तुम्हाला चार चमचे टोमॅटो रसामध्ये दोन चमचे चंदन पावडर मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Skin Care With Coffee | चेहरा स्वच्छ करण्यासाठी कॉफीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Maida Side Effects | मैद्यापासून बनलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Beauty Tips | चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care With Aloevera | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कोरफडीमध्ये मिसळा ‘या’ गोष्टी

Dates and Almonds | खजूर आणि बदामाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे