Dates and Almonds | खजूर आणि बदामाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Dates and Almonds | टीम कृषीनामा: बदाम आणि खजुरामध्ये माफक प्रमाणात पोषक तत्वे आढळून येतात. त्यामुळे बदाम आणि खजुराचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बदामामध्ये प्रोटीन, फायबर, विटामिन ई, मॅग्नेशियम इत्यादी घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. तर खजुरामध्ये कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज, प्रोटीन, फायबर आणि पोटॅशियम आढळून येते. शरीराला अधिक पोषण प्रदान करण्यासाठी तुम्ही बदाम आणि खजुराचे एकत्र सेवन करू शकतात. या दोन्ही गोष्टींचे एकत्र सेवन केल्याने आरोग्य, त्वचा आणि केसांना अनेक फायदे मिळतात. खजूर आणि बदामाचे एकत्र सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

शरीरातील ऊर्जा वाढते (Energy in the body increases-Benefits of Dates and Almonds)

थकवा आणि अशक्तपणा टाळण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी खजूर आणि बदामाचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्ही बदाम आणि खजूर रात्री पाण्यात भिजवून ठेवू शकतात. त्यानंतर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी भिजवलेल्या बदाम आणि खजुराचे सेवन करू शकतात. सकाळी या गोष्टींचे सेवन केल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहू शकतात. यामुळे तुम्हाला लवकर थकवा जाणवणार नाही.

त्वचेसाठी फायदेशीर (Beneficial for skin-Benefits of Dates and Almonds)

प्रत्येकाला सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात खजूर आणि बदामाचा समावेश करू शकतात. यासाठी तुम्ही दररोज चार ते पाच बदाम आणि खजुराचे सेवन करू शकतात. यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेच्या अनेक समस्या सहज दूर करतात.

रक्त वाढते (Blood increases-Benefits of Dates and Almonds)

निरोगी राहण्यासाठी शरीरात रक्ताचे प्रमाण पुरेसे असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण जेव्हा शरीरात रक्ताची कमतरता असते तेव्हा आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खजूर आणि बदामाचा समावेश करू शकतात. कारण या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात आयरन आढळून येते, जे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते. त्यामुळे खजूर आणि बदाम रक्त वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

हाडे मजबूत होतात (Bones become stronger-Benefits of Dates and Almonds)

हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात खजूर आणि बदामाचा समावेश करू शकतात. यासाठी तुम्हाला चार ते पाच खजूर आणि बदाम रात्री दुधामध्ये भिजवून ठेवावे लागेल. त्यानंतर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी त्या खजूर आणि बदामाचे सेवन करावे लागेल. खजूर आणि बदामामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्हाला जर हाडांचा त्रास होत असेल तर तुम्ही आजपासूनच तुमच्या आहारात खजूर आणि बदामाचा समावेश केला पाहिजे.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Dry Skin | हातावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ उपाय

Skin Care With Besan | बेसनाच्या पिठात ‘या’ गोष्टी मिसळून चेहऱ्यावर लावल्याने मिळतील ‘हे’ फायदे

Belpatra Leaves | बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Mayonnaise Side Effects | मेयोनेजचे अति प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ तोटे

Papaya Benefits | फक्त पोटासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायेशीर आहे पपई, जाणून घ्या सविस्तर