शांत आणि निवांत झाेप लागण्यासाठी काय कराल? चला तर जाणून घेऊ….

निरोगी जीवन आणि चिरतरूण दिसण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. माणसाला कमीतकमी सात ते आठ तास शांत झोपेची गरज असते. रात्री निवांत लागली तरच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. मात्र दिवसभर काम करून थकल्यावर जेव्हा रात्री तुम्हाला शांत झोप लागत नाही तेव्हा तुमची फारच चिडचिड होऊ लागते. निद्रानाशामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. यासाठीच आम्ही तुम्हाला शांत आणि निवांत झाेप लागण्यासाठी काही सोप्या टीप्स सांगत आहोत. चला तर जाणून घेऊ….

  • झोपण्याच्या आधी रात्री हात-पायांना कोमट पाण्याने मालीश करा. झोप येण्यासाठी हे अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे तुमच्या शरीरालाही कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
  • झोपण्याआधी कोमट तेलाने हलक्या हातांनी डोक्याला मालीश करा.
  • रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात एक चमचा मध टाकून प्या.
  • रात्री झोपताना सैल कपड्यांचा वापर करा. त्यामुळे शांत झोप तर येईलच पर शरीरही स्वस्थ राहील.
  • जास्त थकला असाल आणि झोप येत नसेल तर झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा कधी-कधी ब्रॅंडीचे दोन घोट घेऊ शकता. फक्त महिन्यातून एक-दोनदा, त्यापेक्षा जास्त नाही.
  •  रात्री जेवणात जास्त तेलकट आणि तिखट मिरचीचे पदार्थ टाळा. या पदार्थांमुळे झोप उडते.

महत्वाच्या बातम्या –