रोज १ टोमॅटो खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून तुम्ही थक्क व्हाल!

टोमॅटोशिवाय आपण किचनमधल्या कुठल्याही ग्रेव्ही रेसिपीचा विचार करू शकत नाही. टोमॅटोचा वापर आपण दैनंदिन आयुष्यात भाजी म्हणूनच करतो, पण खरंतर हे एक फळ आहे. लाल-लाल टोमॅटो जितके दिसायला सुंदर असतात, त्यापेक्षाही चवीला छान आणि भरपूर गुणयुक्त आहेत. याच्या किमतीवरूनच तुम्हाला कळत असेल की, वर्षभर टोमॅटोच्या दरात चढ-उतार होत असतो.

कधी हे एवढे महाग होतात की, घेतानाही विचार करावा लागतो तर कधी दोन देशांच्या युद्धात बिचाऱ्या टोमॅटोवर नामुष्कीची वेळ येते. भारतात टोमॅटोची सर्वात जास्त उत्पादन होते, त्यामुळे ते सहज उपलब्ध होतात. चला तर जाणून घ्या फायदे…

  • बिया नसलेल्या टोमॅटोचा सॅलडमध्ये वापर केल्यास किडनी स्टोनची शक्यता कमी होते.
  • स्मोकिंगमुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठीही टोमॅटोचे सेवन फायदेशीर ठरते.
  • केसांना चमकदार तसेच मजबूच बनवण्यासाठीही टोमॅटो फायदेशीर आहे.
  • पाचनशक्ती वाढवते. पालकाच्या रसात टोमॅटोचा रस मिसळल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
  • अँटीऑक्सिंडंटचे भरपूर प्रमाण असलेल्या टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी आणि ए असते. व्हिटामिन ए डोळ्यांसाठी तसेच डिहायड्रेशनसाठी चांगले.

महत्वाच्या बातम्या –