Fennel Health Benefits | रिकाम्या पोटी बडीशेप खाल्ल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय जेवणामध्ये बडीशेप (Fennel) एक मसाला पदार्थ म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर बडीशेपचा माऊथ फ्रेशनर म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बडीशेपयामध्ये अनेक पोषक घटक आणि औषधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे बडीशेपचे सेवन करणे आरोग्यासाठी (Health) फायदेशीर ठरू शकतो. त्याचबरोबर पोट आणि पचनाशी संबंधित अनेक समस्यांवर बडीशोप फायदेशीर ठरू शकते. कारण बडीशेपमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक आढळतात. त्यामुळे बडीशेप शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकते. त्याचबरोबर रिकाम्या पोटी बडीशेप खाणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

प्रतिकारशक्ती वाढते

बडीशेपमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी बडीशेप खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत असल्यास तुम्ही मोसमी आजारांपासून दूर राहू शकतात.

हृदयासाठी उपयुक्त

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी सकाळी बडीशेप खाणे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. कारण बडीशेपमध्ये आढळणारे पोटॅशियम शरीरातील रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. परिणामी हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी होऊ शकतो.

हाडे मजबूत राहतात

सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे सेवन केल्याने शरीरातील हाडे मजबूत होऊ शकतात. कारण यामध्ये पुरेशा प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

अशक्तपणा दूर होतो

रक्ताची कमतरता किंवा अशक्तपणाची समस्या असेल, तर बडीशेपच्या नियमित सेवन आणि ती कमी होऊ शकते. कारण शरीरात रक्ताची कमतरता किंवा अशक्तपणाची समस्या निर्माण झाल्यास डॉक्टर आयरनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. बडीशेप मुबलक प्रमाणात आयरन आढळून येते. त्यामुळे बडीशेपचे दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने अशक्तपणा दूर होऊ शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या