Pomegranate Benefits | डाळिंबाचे सेवन केल्याने महिलांना मिळू शकतात ‘हे’ फायदे

Pomegranate Benefits | टीम कृषीनामा: डाळिंब हे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. डाळिंब हे एक सुपर हेल्दी फळ आहे, ज्याचे सेवन करून अनेक आजार टाळता येऊ शकतात. कारण डाळिंबामध्ये माफक प्रमाणात फायबर, विटामिन के/सी/बी, आयरन, पोटॅशियम, ओमेगा 6 फॅटी अॅसिड यासारखे पोषक तत्वे आढळून येतात. विशेषता डाळिंबाचे सेवन करणे महिलांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. डाळिंबाचे सेवन केल्याने महिलांना पुढील फायदे मिळू शकतात.

प्रजनन क्षमता वाढते (Increases fertility-Pomegranate Benefits)

डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने स्त्रियांमधील प्रजनन विकार दूर होऊ शकतात. एका वैद्यकीय संशोधनानुसार, डाळिंबाचे सेवन केल्याने ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी होऊन प्रजनन क्षमता वाढू शकते. त्यामुळे डाळिंबाचे सेवन करणे महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते.

त्वचा चमकदार होते (The skin becomes shiny-Pomegranate Benefits)

डाळिंबामध्ये आढळणारे पोषक घटक त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. त्वचा हायड्रेट राहिल्यामुळे डाग, खाज, कोरडेपणा इत्यादी समस्या दूर होतात. त्याचबरोबर नियमित डाळिंबाचे सेवन केल्याने त्वचेवरील कोलेजनची पातळी टिकून राहते आणि चेहरा दीर्घकाळ निरोगी राहतो.

केस मजबूत होऊ शकतात (Hair can be strengthened-Pomegranate Benefits)

केसांची काळजी घेण्यासाठी डाळिंबाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. आठवड्यातून तीन ते चार वेळा डाळिंबाचे सेवन केल्याने टाळू निरोगी राहून केस गळतीची समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर केसांच्या समस्येवर उपाय शोधत असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात डाळिंबाचा समावेश करू शकतात.

पचनक्रिया सुधारते (Improves digestion-Pomegranate Benefits)

अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याचे सवयींमुळे आजकाल महिलांमध्ये अपचनाच्या समस्या अधिक दिसू लागल्या आहेत. डाळिंब हे पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने पोट दुखी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.

डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने महिलांना पुढील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर शरीरातील विटामिन डीची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही पुढील खाद्यपदार्थांचे सेवन करू शकतात.

अंडी (Egg-For Vitamin D)

शरीरातील विटामिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंड्याचा समावेश करू शकतात. अंड्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन प्रमाणे विटामिन डी भरपूर प्रमाणात आढळून येते. त्याचबरोबर अंड्याचे सेवन केल्याने शरीरातला इतर अनेक पोषक तत्वे मिळू शकतात.

मासे (Fish-For Vitamin D)

माशांमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड आढळून येते. त्याचबरोबर माशांमध्ये विटामिन डी देखील माफक प्रमाणात आढळून येते. शरीरातील विटामिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही सॅल्मन मासे खाऊ शकतात. 100 ग्रॅम सॅल्मन माशांमध्ये सुमारे 245 आययू विटामिन डी आढळून येते. त्यामुळे शरीरातील विटामिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी सॅल्मन माशांचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

संत्रा (Orange-For Vitamin D)

संत्र्याला विटामिन सीचा चांगला स्त्रोत मानला जातो. परंतु संत्र्यामध्ये विटामिन डी देखील चांगल्या प्रमाणात आढळून येते. त्याचबरोबर संत्र्यामध्ये कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखे इतर पोषक घटक देखील आढळून येतात. त्यामुळे संत्र्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. संत्र्याच्या रसाच्या सेवन केल्याने शरीरातील विटामिन डीची कमतरता दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Vitamin D | सप्लीमेंट्स नाही, तर ‘या’ पदार्थांचे सेवन करून विटामिन डीची कमतरता करा दूर

Benefits of Pulses | दररोज कडधान्याचे सेवन केल्याने शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Cockroach | घरामध्ये झुरळाचे प्रमाण वाढले आहे? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Fenugreek Seeds | सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Amla Juice | चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आवळ्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर