🕒 1 min read
दररोज दुपारच्या जेवणानंतर काही प्रमाणात दही (Yogurt) खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक आरोग्यही सुधारतं आणि वजन नियंत्रित राहतं. ताण जाणवतं असल्यास किंवा मळमळ होत असल्यास दही (Yogurt) भाताचे सेवन करायला हवे. हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
दररोजच्या जवेणात आपण भात नियमित खातो. परंतु, दही (Yogurt) खाण्याचे प्रमाण खुपच कमी आहे. आठवड्यातून किमान दोन-तीन दिवस तरी दह्याचे सेवन केले पाहिजे. भात खाण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत. यामुळे दहा-भात खाल्ल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे (Advantages) होतात. या आहारामुळे कोणते फायदे (Advantages) होतात ते जाणून घेवूयात.
- वजन कमी होते
दही भात नियमित खाल्याने वजन कमी होते. कॅरलीज घटतात.
- तापावर फायदेशीर
ताप आल्यावर दही भात खाणे फायदेशीर ठरते. अनेकदा तापात काही खाण्याची इच्छा होत नाही. मात्र दही भात खाल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. तसंच दह्यामुळे तुमची इम्मुनिटी वाढते.
- पोट बिघडल्यावर
पोट बिघडल्यावर इतर पदार्थ खाण्यावर बंधन येतात. पण दही भाताने पोट शांत होते. अन्न व्यवस्थित पचते आणि जुलाबावर आराम मिळतो.
- बद्धकोष्ठतेवर परिणामकारक
तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर काही दिवस दही भाताचे सेवन करा. त्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरीया असतात. त्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
- तणावमुक्ती
दही भात खाल्याने तणाव कमी होतो. त्यात असलेल्या प्रोबायोटिक बॅक्टेरीया, अॅंटी ऑक्सीडेंट आणि गुड फॅट्स यामुळे मुड सुधारण्यास मदत होते.
महत्वाच्या बातम्या –
- रात्री झोपण्यापूर्वी सॉक्समध्ये कांद्याचा तुकडा ठेवल्याने होतात ‘हे’ विविध फायदे
- प्रवासादरम्यान तुम्हाला उल्टी येत असेल तर करा ‘हे’ उपाय
- राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे विमा कंपन्यांकडून २ हजार ४५० कोटी रुपयांची पिकविम्याची नुकसान भरपाई
- महिला शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – दादाजी भुसे
- देशात गेल्या २४ तासात कोरोनामुळे 453 लोकांचा मृत्यू; तर ‘इतक्या’ रुग्णांची वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now





