झोपण्यापूर्वी दुधात तूप टाकून पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..

आयुर्वेदात तूप आणि दूध यांना खूप महत्त्व आहे. झोपण्यापूर्वी तूप दुधात घालून प्यायलं तर अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. तसेच तूप मिश्रित दूध पिल्यास शरिराच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण होतात. तुपामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. आयुर्वेदानुसार जर तूप दुधात घालून प्यायलं तर अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. लहान मुलांसाठी तर हे खूप उपयुक्त असतं, कारण लहान मुलं सतत खेळत असतात. दुधात तूप टाकून प्यायल्यानं स्टॅमिना वाढतो. तूप घातलेलं दुध प्यायल्यानं हाडं मजबुत होतात. तर ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, त्यांच्यासाठी तर हे दुध अमृतासारखं असतं. गायीच्या तुपात कोलेस्ट्रॉल नसतं. त्यामुळे

  • मेटॅबॉलिझम वाढतं – दूध आणि तूपाचं मिश्रण मेटॅबॉलिझम चांगलं करतं आणि आपल्या शरीरातील ऊर्जा आणि शक्ती वाढवतं. शरीरातील वाईट पदार्थ बाहेर काढून शरीराला डिटॉक्स करण्याचं कामही दूध आणि तूप करतं.
  • पचनशक्ती वाढते – तूप मिश्रित दुधामध्ये ब्यूट्रिक अ‍ॅसिड असते. ते आपल्या शरीरातील पचनासाठी असलेले एंझाईम्स वाढवतो. जर आपली पचनशक्ती कमी असेल तर आपण रात्री झोपण्यापूर्वी हे तूप टाकलेलं दूध नक्की प्या.
  • रक्तदाब नियंत्रणात राहतो – दूधामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. रक्तदाब योग्य प्रमाणात असल्यास हृदयावर ताण येत नाही त्यामुळे हृदयाचे कार्य चांगले रहावे यासाठी झोपताना तूप मिश्रित दूध प्यायलेले फायदेशीर ठरते.
  • शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते – शरीरातील वाईट पदार्थ बाहेर काढून शरीराला डिटॉक्स करण्याचं काम तूप मिश्रित दूध करतं.
  • पोटासाठी फायदेशीर- जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दूधामध्ये तूप टाकून प्यावं. त्यात ब्यूट्रिक अॅसिड असतं ते आपल्या शरीरातील पचनासाठी असलेले एंझाईम्स वाढवतो. जर आपली पचनशक्ती कमी असेल तर आपण रात्री झोपण्यापूर्वी हे तूप टाकलेलं दूध नक्की प्या.

महत्वाच्या बातम्या –