उचकी लागल्यास काय कराल? जाणून घ्या फक्त एका क्लीकवर….

Published On: 

उचकी लागणे म्हणजे छाती व पोट यामधील पडदा आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होणे व त्याचवेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतु व्होकल कॉर्ड एकमेकांजवळ येणे. हे कार्य मज्जा संस्थेचे असते. मेंदूतून येणाऱ्या व्हेगस व फ्रेनिक या मज्जा तंतुच्या नसा उचकी लागण्यास महत्त्वाचे कार्य करतात. व्हेगस या नसेतून अन्ननलिका व जठराच्या आतील भागातुन संवेदना मेंदूकडे जातात. त्याने एका प्रक्षेपित क्रियेची सुरवात होते. छाती व पोट यामधील पडदा (डायफ्राम) व बरगड्यांमधील काही स्नायू आकस्मित कार्यान्वित होतात व स्वरतंतु जवळ येतात. चला तर मग जाणून घेऊ घरगुती उपाय …..

  • थंड पाणी प्या किंवा बर्फाचा खडा तोंडात ठेवून हळूहळू चोखा. हे केल्यानंतरच काही वेळात उचकी बंद होते.
  • चकी आल्यावर एका चमचा लिंबाचा ताजा रस आणि एक चमचा मध एकत्र करुन त्याचे चाटण तयार करा. हे चाटण घेतल्यानंतर काही वेळात उचकी बंद होते.
  • काळी मिरी वाटून बारीक चूर्ण करा. दोन ग्रॅम चूर्ण मधात मिसळून खा. हे केल्यानंतरच काही वेळात उचकी बंद होते.
  • उचकी आल्यावर लगेच एक चमचा साखर खावी. साखर खाल्यामुळे थोड्यावेळात उचकी थांबते.
  • दालचीनीचा एक तुकडा तोंडात टाकून तो चघळा. हे केल्यानंतरच काही वेळात उचकी बंद होते.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य बातम्या
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या