आरोग्यासाठी तुळस आहे अतिशय फायदेशीर; जाणून घ्या ‘हे’ फायदे

Published On: 

अनेक घरांमध्ये तुळशीचं रोपटं पाहायला मिळतं. हिंदू संस्कृती मानणाऱ्या अनेक कुटुंबात तुळशीचं खास महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधीय गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते.

  • तुळस दिवसभराचा थकवा दूर करते
  • अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम मिळून तणाव कमी होण्याची शक्यता असते.
  • तुळशीत मोठ्या प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-इंफ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात.
  • दररोज तुळशीची पानं खाल्ल्याने फ्लूचा धोकाही दूर होण्यास मदत होते.
  • तुळशीचा काढा सर्दी-खोकल्यावर रामबाण मानला जातो. काढा बनवण्यासाठी तुळशीची पानं पाण्यात टाकून त्यात काळी मिरी आणि खडीसाखर मिसळून त्याचे सेवन करा. सर्दीसाठी हा काढा अतिशय गुणकारी ठरतो.
आरोग्य बातम्या
KrushiNama

"शेतीच्या बांधावरची प्रत्येक बातमी आणि बाजारातील अचूक घडामोडी 'कृषीनामा' अत्यंत सोप्या भाषेत देत आहे. शेतकऱ्यांच्या फायद्याच्या बातम्या, शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि रोजचे बाजारभाव थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे."

🕘 संबंधित बातम्या