महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सर्वाधिक पुरस्कार; वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या पुरस्कारांचे वितरण

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना राष्ट्रीय स्तरावरील सहकारी साखर कारखान्यांसाठी देण्यात आलेल्या पुरस्कारामंध्ये सर्वाधिक पुरस्कार मिळवून देशस्तरावर मोहर उमटवली आहे. वर्ष 2019-20 आणि 2020-21 च्या  पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

येथील एपिडा सभागृहात राष्ट्रीय फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फॅक्ट्रीज्स ली. च्या वतीने ‘दक्षता पुरस्कारा’चे  वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री बी.एल. वर्मा, राज्यसभेचे ज्येष्ठ सदस्य शरद पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, फेडरेशनचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, कार्यकारी संचालक प्रकाश नायकनवरे, यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर  उपस्थित होते.

वर्ष 2019-20 मध्ये एकूण 92 तर वर्ष 2020-21 मध्ये 108 साखर कारखान्यांनी पुरस्कारांसाठी भाग घेतला होता.  कारखान्यांचे मूल्यमापन विविध निकषांच्या आधारावर करून पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. मुल्यमापनासाठी सरासरी दहा टक्के  व त्याहून अधिक साखरेचा उतारा असलेले आणि दहा टक्क्यांपेक्षा कमी उतारा असलेले साखर कारखाने अशा दोन श्रेणींमेध्ये मूल्यमापन झाले होते.  केन डेव्हल्पमेंट पुरस्कार , तांत्रिक दक्षता पुरस्कार, आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार, सर्वाधिक केन क्रशिंग पुरस्कार, सर्वाधिक साखर वसुली पुरस्कार, उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार, कमाल साखर निर्यात पुरस्कार अशी पुरस्कारांची विभागणी करण्यात आलेली आहे. पुरस्कार क्रमाक्रमाने केंद्रीय राज्यमंत्री , श्री पवार, श्री वळसे-पाटील, श्री टोपे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.

वर्ष 2019-20 आणि 2020-21 चे पुरस्कार पुढील प्रमाणे वर्ष 2019-20 चे  पुरस्कार

‘वसंतदादा पाटील राष्ट्रीय पुरस्कार’  हा पुरस्कार साखर कारखान्यांच्या सर्वसमावेशक कामांसाठी दिला जातो. हा पुरस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखाना मर्यादित, अंबेगाव पुणे यांना मिळाला.

प्रथम आणि व्दितीय ‘केन डेव्हल्पमेंट पुरस्कार’ महाराष्ट्राच्या डॉ पतंगराव कदम सोनहीरा सहकारी साखर कारखाना मर्यादित, कडेगाव सांगली आणि अंजिक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्यादित शेंद्रे, सातारा यांना‍ प्राप्त झाला

‘तांत्रिक दक्षता पुरस्कार’ हा पुरस्कार राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांना मिळालेला आहे. यामध्ये  श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना मर्यादित जुन्नर, पुणे आणि क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापु लाड सहकारी साखर कारखाना मर्यादित पळुस, सांगली यांना मिळाला आहे.

‘आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार’ चा व्दितीय पुरस्कार राज्यातील  कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना मर्यादित अंबड, जालनाला  मिळालेला आहे.

‘सर्वाधिक साखर वसुली पुरस्कार’ चा  प्रथम पुरस्कार राज्यातील कुंभी-केसरी सहकारी साखर कारखाना मर्यादित, करवीर, कोल्हापूर ला मिळालेला आहे.

‘कमाल साखर निर्याती पुरस्कार’  चा प्रथम पुरस्कार जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित हातकंलगले, कोल्हापूर आणि व्दितीय पुरस्कार सह्याद्री सहकारी साखर कारखाना मर्यादित कराड, सातारा ला प्रदान करण्यात आला आहे.

वर्ष 2020-21 चे पुरस्कार पुढील प्रमाणे

‘वसंतदादा पाटील राष्ट्रीय पुरस्कार’  हा श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना मर्यादित माळशिरस, सोलापुर यांना प्रदान करण्यात आला.

सर्वसमावेशक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पश्चिम झोनचा पुरस्कार श्री छत्रपती शाहु सहकारी साखर कारखाना मर्यादित कागल, कोल्हापूर ला मिळाला.

प्रथम आणि व्दितीय केन डेव्हल्पमेंट पुरस्कार राज्यातील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित शिरोळा, कोल्हापूर आणि राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना मर्यादित वाळवा, सांगली ला प्राप्त झाला आहे.

तांत्रिक दक्षता पुरस्कार हा पुरस्कार राज्यातील दोन सहकारी साखर कारखान्यांना मिळालेला आहे. यामध्ये  श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना मर्यादित जुन्नर, पुणे आणि डॉ. पंतगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना मर्यादित कडेगाव, सांगली ला मिळाला आहे.

‘सर्वाधिक ऊस गाळपचा पुरस्कार’  जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित हातकंलगले, कोल्हापूरला  प्राप्त झाला आहे.

‘सर्वाधिक साखर वसुलीचा पुरस्कार’  अज्यिंकतारा सहकारी साखर कारखाना मर्यादित शेंद्रे, साताराला प्राप्त झाला आहे. ‘कमाल साखर निर्यातीचा प्रथम पुरस्कार’ विठ्ठलराव शिंदे शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित माढा, सोलापूर आणि व्दितीय पुरस्कार सह्याद्री सहकारी साखर कारखाना मर्यादित कराड, सातारा ला प्रदान करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –