मोठी बातमी – राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा लवकरच सुरु होणार

मुंबई – मागील वर्षापासून असलेल्या कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे शाळा, कॉलेज बंद होते. मात्र सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने पुन्हा एकदा शाळा, कॉलेज सुरु करण्यात आले. परंतु इयत्ता पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यात आल्या नाहीत. आता लवकरच  सर्व शाळा  पहिली ते चौथी शाळा सुरु करण्यात येणार आहे, येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत मिळेत मिळत आहेत. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर शाळेबाबत निर्णय होणार आहे.

पहिली ते चौथी शाळा ग्रामीण भागांसह शहरांत येत्या 10 ते 15 दिवसांत सुरू होण्याचे संकेत आहेत. कोरोना कृती दल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतर लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्व शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांचे सचिव आणि अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या –