जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव झाला असून आतापर्यंत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे 23 रुग्ण सापडले आहेत. महारष्ट्रात सुरुवातीला या नव्या व्हेरिएंटचे २ रुग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी(६ डिसें.)ओमायक्रॉनचा(Omicron) दहावा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
सोमवारी मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून, दक्षिण आफ्रिकेतून २५ नोव्हेंबरला मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय प्रवाशाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे २९ नोव्हें.ला आढळले होते. त्यामुळे त्याचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाच्या सहवासातील व्यक्तींचा शोध घेतला असता त्याच्याबरोबर राहिलेल्या ३६ वर्षीय मैत्रिणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे ३० नोव्हेंबरला आढळले होते. ही महिला २५ नोव्हेंबरला अमेरिकेतून मुंबईत आली होती. तिलाही ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे जनुकीय कर्मनिर्धारणादरम्यान स्पष्ट झाले.
दरम्यान, शनिवारी डोंबिवलीत राज्यातील पहिला ओमायक्रॉन रुग्ण आढळला होता. त्यानंतर पिंपरीतील सहा आणि पुण्यातील एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले होते. आता अजून दोन रुग्णांची भर पडल्याने राज्यातील रुग्णसंख्या १० वर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ओमिक्रॉनचा कहर! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
- अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील – विश्वजीत कदम
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पंतप्रधान किसान योजनेचा 10 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
- पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी आता एकदाच अर्ज करा; मोबाईल ऍपद्वारे योजनांचा लाभ, प्रतिक्षा यादीचीही तरतूद
- कडुलिंबाचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now




