Share

काळजी घ्या! राज्यात तब्बल ३५ दिवसानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्खेत मोठी वाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – जगभरात कोरोनाच्या (corona ) नव्या व्हेरियंटनं कहर सुरु आहे. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omycron) चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमायक्रॉनची (Omycron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव झाला आहे. राज्यातही ओमायक्रॉनची (Omicron) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्णही हळूहळू वाढू लागले आहे. देशात आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे २१३ रुग्ण आढळून आले आहेत.

तर देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे (corona )  ७ हजार ४९५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर देशात गेल्या २४ तासात  कोरोनामुळे (corona ) ४३४ लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत  देशात तब्बल 4 लाख 7८ हजार ३०६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

राज्यात तब्बल ३५ दिवसानंतर कोरोनाच्या वाढ झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत १२०० नवे कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. ३५ दिवसानंतर राज्यात संख्या हि १००० च्या पुढे गेली आहे. तर राज्यात गेल्या २४ तासात ८ रुग्णांच्या कोरोनाबाधिता मृत्यूची नोंद झालीय. तर मुंबई मध्ये गेल्या २४ तासात ४०० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.  तर राज्यात गेल्या २४ तासात ओमायक्रॉनचा (Omicron)  एकही रुग्ण आढळून आला नाहीत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
आरोग्यबातम्या (Main News)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या