🕒 1 min read
नाशिक – हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ७ जानेवारीला अवकाळी पाऊस (Untimely rain) पडला. तर हवामान अंदाजनुसार धुळे जिल्ह्यात ७ जानेवारीला अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, शिंदखेडा, शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा अनेक भागात अवकाळी पावसाने दणका दिला आहे. तर या भागात अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारी, हरभरा, मका, गहू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
धुळे जिल्ह्यात सुमारे तीन ते चार मिनिटे काही भागात गारपीट झाली तसेच डिसेंबर महिन्यापासून शेतकरी मोठ्या अडचणीत आहे, कारण डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर डिसेंबर महिन्याच्या शेवटी ,म्हणजेच २७ डिसेंबर ला मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटी पडल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध; जाणून घ्या नवी नियमावली
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील ३ दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता
- महाराष्ट्राचा ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राजस्थान सरकारकडून स्वीकार
- जिल्ह्यातील पक्षी संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार – दत्तात्रय भरणे
- जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 च्या 571 कोटींच्या आराखड्यास मान्यता
- राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा; राज्यातील ‘या’ पंचायतीचा देशात दुसरा क्रमांक







