राज्यात गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये एकूण १८४ साखर कारखाने सुरू; ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने सुरु  

राज्यातील साखर उत्पादनात चांगलीच वाढ झाली आहे, राज्यात २०२१-२२ मध्ये राज्यात तब्बल १८४ साखर कारखाने  (Sugar factory) सुरु झाले आहे. तर ९१ खासगी व ९३ सहकारी तसेच साखर कारखान्यांचा   (Sugar factory)समावेश आहे. आतापर्यंत जवळपास 312.68 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.

राज्यात ११ डिसेंबर २०२१  पर्यंत तब्बल 292.12 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. अशी माहिती आयुक्तालयाकडून मिळाली आहे,  तर  यामुळे राज्यातील साखर उताऱ्यात चांगली वाढ झाली असून आता राज्याचा सरासरी साखर उतारा 9.34 टक्के इतका आहे.

तर राज्यातील पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल 65.11 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर पुणे जिल्ह्यामध्ये 62.75 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील  साखर उतारा 9.64 टक्के आहे. तर राज्यातील औरंगाबाद  जिल्ह्यामध्ये तब्बल 21.57 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर औरंगाबाद  जिल्ह्यामध्ये 18.6 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. औरंगाबाद  जिल्ह्यातील  साखर उतारा 8.62 टक्के आहे.

राज्यात आतापर्यंत सर्वाधिक ४३ साखर कारखाने   (Sugar factory) सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरु झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 75.64 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 63.81 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील  साखर उतारा 8.44 टक्के आहे.

महत्वाच्या बातम्या –